death esakal
जळगाव

जळगाव : बेपत्ता प्रौढाचा मृतदेह आढळला

गेल्या तीन ते चार दिवसांपासून ते बेपत्ता होते.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गेल्या तीन ते चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शरद मोतीलाल तायडे (वय ५८, रा. हरिविठ्ठलनगर) यांचा मृतदेह शनिवारी (ता. ९) दुपारी नशिराबाद स्मशानभूमीजवळील वाकी नदीपात्रात आढळून आला. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

शहरातील हरिविठ्ठलनगरात शरद तायडे हे वास्तव्यास असून ते बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिपाई म्हणून नोकरीस होते. ते नाशिक येथे आपल्या मुलाकडे गेले होते, काही दिवस मुलाकडे राहिल्यानंतर ते नाशिकहून जळगावला परत यायला निघाले. परंतु ते जळगावला न पोहचता ते नशिराबाद येथे पोहचले. त्याठिकाणाहून त्यांनी मुलगा भावेशला फोन करून आपण नशिराबाद येथे पोहचल्याचे सांगितले. परंतु दोन दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने तसेच ते घरीदेखील परतले नसल्याने त्यांचा मुलगा भावेशने त्यांचा शोध सुरु केला.

अखेर भावेश तायडे यांनी नशिराबाद पोलिसात वडील हरविल्याची तक्रार दिली. दरम्यान, शनिवारी सकाळच्या सुमारास नदीपात्रालगत असलेल्या विटभट्टीवरील मजुरांना नदीपात्रात मृतदेह तरंगतांना दिसून आला. त्यांनी घटनेची माहिती नशिराबाद पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस कर्मचारी विजय अहिरे यांच्यासह तायडे यांच्या नातेवाइकांना घटनास्थळी बोलविण्यात आले.

तायडे यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी हा मृतदेह शरद तायडे असल्याची ओळख पटविली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT