Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipal News: नळ कनेक्शनसाठी पाणीपुरवठा विभागातर्फे नागरिकांना बोगस पावत्या; कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नळकनेक्शन देण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे बोगस पावत्या देण्यात येत आहेत. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका गायत्री शिंदे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की माझ्या शिवाजीनगर भागातील प्रभागातील नागरिकाला घरपट्टी थकबाकी भरल्याशिवाय नळकनेक्शन मिळणार नाही, असे सांगितले. त्याच्याकडून थकीत घरपट्टी भरावयाच्या नावाखाली बारा हजार रुपये घेतले व फक्त आठ हजार रुपयांची ‘जळगाव शहर महानगरपालिका’, अशी नाव नसलेली नाममात्र बोगस पावती त्यांना दिली.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

ही रक्कम भरल्यानंतर तब्बल पंधरा महिने उलटले, तरी संबधित व्यक्तीला नळकनेक्शन देण्यात आले नाही. संबंधित नागरिकाने नगरसेवक म्हणून आपल्याकडे तक्रार केल्यावर कर्मचाऱ्यांकडून व त्यांच्या साथीदाराकडून धमकाविण्याचा प्रकार करण्यात आला. या प्रकाराला विभागाचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारीही जाबाबदार आहेत. या लाजीजरवाण्या प्रकारामुळे महापालिकेच्या विश्‍वसनीयतेवर प्रश्‍नचिन्ह उभे राहत आहे.

यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसानही होत आहे. शहरात अनेक भागांत असा प्रकार घडण्याची शक्यताही आहे. आपण महापालिकेची बोगस पावतीही सोबत जोडलेली आहे. त्यामुळे संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT