beating sakal
जळगाव

Jalgaon : मारहाणीत तरुणाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर

नशिराबाद येथे काहीही कारण नसताना तरुणाला लोखंडी रॉडने हल्ला करून मारहाण केल्याने नाक फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नशिराबाद येथे काहीही कारण नसताना तरुणाला लोखंडी रॉडने हल्ला करून मारहाण केल्याने नाक फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली. नशिराबाद पोलीसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नशिराबाद पोलीसांत दाखल तक्रारीनुसार, सैय्यद अर्शद अली शेख (वय १८) हा कुटुंबीयांसह ताजनगर डीपीजवळ वास्तव्याला आहे. शनिवारी (ता. २१) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास शहरातील परकोट मोहल्ला येथे सैय्यद अर्शद अली शेख हा उभा असताना विनाकारण त्याच्या गल्लीतील नाजीम रहीम शेख (वय २१), रहिम शेख फरीद (वय ३५), शेर अली सैय्यद अली (वय २८) आणि अरबाज अली सैय्यद अली (वय २४, सर्व रा. परकोट मोहल्ला) अशांनी त्याला बेदम मारहाण केली. यातील एकाने सैय्यद अर्शद अली शेख याच्या नाकावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याने त्याचे नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. नाकातून प्रचंड रक्तस्त्राव होत असताना त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीचा जबाब नोंदवून मध्यरात्री नाजीम रहीम शेख, रहिम शेख फरीद, शेर अली सैय्यद अली आणि अरबाज अली सैय्यद अली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक युनूस शेख करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT