Boy arrested from Pachora in case of father murder jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Crime News: वडिलांच्या खूनप्रकरणी मुलास पाचोरा येथून अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ९) शेतीच्या वादातून मुलाने वडिलांचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती. (Boy arrested from Pachora in case of father murder jalgaon news)

या गुन्ह्यात संशयिताच्या मुलानेच पोलिसांत फिर्याद दिली होती. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना झाली होती. दरम्यान, संशयित कैलास बडगुजर याला शनिवारी (ता. ९) मध्यरात्री अटक करण्यात आली.

शेतकरी नाना बडगुजर (वय ८२) हे शनिवारी सकाळी शेतात कपाशी वेचत असताना मुलगा संशयित कैलास नाना बडगुजर (वय ५६) याने पित्यासोबत वाटणीवरून वाद घालून वडील नाना बडगुजर यांच्या डोक्यात भुसा भरण्याच्या पावड्याने डोक्यात जोरात वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर संशयित कैलास याने घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी शेंदुर्णी दूरक्षेत्रचे पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, शशिकांत पाटील, पोलिस कर्मचारी प्रशांत विरनारे, शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करीत साहित्य ताब्यात घेतले.

दिवसभर संशयित मुलगा कैलास बडगुजर याचा शोध सुरू करून पथके रवाना करण्यात आली होती. पाचोरा येथून घेतले संशयिताला रात्री अटक केली आहे. पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT