Beating esakal
जळगाव

Jalgaon : जुन्या वादातून मुलास बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : जुना भांडण (Old Dispute) उकरून एकाने १७ वर्षीय मुलाच्या डोक्यावर लोखंडी फायटरने जबर मारहाण (Beaten to death) केल्याची थरारक घटना शहरातील पाटील वाड्यात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (boy beaten to death over an old dispute Jalgaon Crime News)

याबाबत सविस्तर वृत्त, शहरातील पाटील वाडा येथील गफ्फार बागवान हे वरील ठिकाणी कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान शनिवार, २५ जुन रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास कृष्णा बापू पाटील रा. पाटील वाडा ता. चाळीसगाव याने जुना वाद उकरून मुलगा अबरार गफ्फार बागवान (वय-१७) यांच्या खांद्या व डोक्यावर लोखंडी फायटरने बेदम मारहाण केली. तेव्हा वडिलांसह परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु या वादात अबरार याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला लागलीच शहरातील खासगी दवाखाण्यात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांच्या जबाबावरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना पंकज पाटील हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT