Emotional story esakal
जळगाव

नशिबानं थट्टा कशी मांडली...! मातृ-पितृ छत्र हरपले, शिकण्याची जिद्द कायम

‘ज्याचा होता त्याने नेला’ या संत गाडगेबाबांनी सांगितलेला सामाजिक संदेश आपल्या कृतीतून दाखवून दिला.

उमेश काटे

अमळनेर (जि. जळगाव) : ‘घरात अठरा विश्व दारिद्र्य’... त्यात पाच महिन्यांपूर्वी वडिलांचे अल्प आजाराने निधन झाले...एक दुःख विसरत नाही, तोच क्रूर नियतीने वेगळाच डाव मांडला... दोन दिवसांपूर्वी आईचेही निधन झाले.. पितृछत्राबरोबरच मातृछत्रही हरपल्यामुळे दोन्ही मुले निराधार झालीत...‘नशिबाने थट्टा कशी मांडली’ या उक्तीचा प्रत्यक्ष प्रत्यय सर्वांनाच आला. मातृ-पितृछत्र हरपले तरी येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूलचा सातवीचा विद्यार्थी ओम वाल्मीक हटकर (वय १२) याची शिकण्याची जिद्द मात्र कायम राहिली.. आईच्या अंत्यसंस्कारानंतर डोळ्यातील अश्रू पुसून लगेचच त्याने आपल्या निवासी सैनिकी शाळेत येऊन आपल्या शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला. ‘ज्याचा होता त्याने नेला’ या संत गाडगेबाबांनी सांगितलेला सामाजिक संदेश आपल्या कृतीतून दाखवून दिला. (Latest Marathi News)

दुई (ता. मुक्ताईनगर) येथे वाल्मीक बळीराम हटकर- पाटील व मनीषा वाल्मीक हटकर- पाटील हे आपले दोन्ही मुले ओम व जय या दोन्ही मुलांसमवेत गुण्यागोविंदाने राहत होते. शेती नसल्यामुळे भूमिहीन असलेले वाल्मीक पाटील हे शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवत होते. मोठा मुलगा ओम हटकर-पाटील यास अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूलमध्ये प्रवेशित केले. त्या दरम्यान सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली अन् वाल्मीक पाटील यांचे वयाच्या ३६ व्या वर्षी क्षयरोगाने ३ फेब्रुवारी २०२२ ला निधन झाले. त्या दिवसापासून मनीषा पाटील या मानसिक व शारीरिकदृष्ट्या खचल्या होत्या. त्यांनीही अन्नत्याग केल्यामुळे सोमवारी (ता.२५) वयाच्या ३२ व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले.

मातृ -पितृ छत्र हरपल्यानंतर ओम हटकर हा लहानसा आपल्या मामाच्या गावी आईच्या अंत्यसंस्कारासाठी गेला. या वेळी त्याने अग्निडाग देऊन आपल्या दुःखाला वाट करून दिली. अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर त्याने लगेचच अमळनेर येथील निवासी सैनिकी शाळेत परतण्याचा निर्णय घेतला. त्याची शिक्षणाप्रती असलेली आवड पाहून सर्वांनाच हायसे वाटले. दुःख चघळून परिस्थिती बदलणार नाही, याची त्याला जणू काही जाणीव झाली असेल या अविर्भावात तो परत शाळेत परतला. सद्य:स्थितीत ओम व जय या दोन्ही मुलांची जबाबदारी त्यांचे काका डिगंबर पाटील (ह.मु. धुळे) यांच्यावर आली आहे.

तहसीलदारांची कार्यतत्परता

अमळनेर येथील तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना ओम हटकर या विद्यार्थ्याची करुण कहाणी ‘सकाळ’चे बातमीदार तथा आर्मी स्कूलचे शिक्षक उमेश काटे यांनी सांगितली. श्री. वाघ यांनी तत्काळ संपूर्ण माहिती घेऊन मुक्ताईनगरचे तहसीलदार श्वेता संचेती यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्या विद्यार्थ्याची करुण कहाणी ऐकून त्यांचेही मन हेलावले. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत शासनातर्फे वीस हजार रुपयाच्या मदतीचा प्रस्ताव सादर करून संजय गांधी निराधार योजना मंजूर करण्याची ग्वाही दिली. विशेष म्हणजे, श्री. वाघ व श्रीमती संचेती यांनी दानशूर व्यक्तीकडून मदत करण्याचेही आश्वासन दिले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे दोन्ही मुलांच्या शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन येथील शिवशाही फाउंडेशन यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT