Death News esakal
जळगाव

Jalgaon News : झोका खेळताना गळफास लागून मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : शहरातील मुंदडानगरातील एका १४ वर्षीय मुलाचा झोका खेळताना अचानक गळफास लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. २०) रात्री सव्वाआठच्या सुमारास मुंदडानगरात घडली.

वेदांत संदीप पाटील, असे मृत बालकाचे नाव असून, रविवारी तो घरी वरच्या मजल्यावर झोक्यावर बसून अभ्यास करत असताना झोक्याच्या दोरीचा गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाला.(Boy died of strangulation while playing Tilt Jalgaon News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची...

ही घटना आई- वडिलांना समजताच त्यांनी हंबरडा फोडला. हा विद्यार्थी मुंदडा ग्लोबल स्कूलचा नववीचा विद्यार्थी असून, त्याचे आई- वडिल दोन्ही शिक्षक आहेत. एस. आर. पाटील यांचा तो मुलगा आहे.

काही महिन्यांपूर्वी कोण बनणार करोडपती, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका जयश्री पाटील यांचा मुलगा होता. त्याचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने सर्वत्र व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT