mohammad magsud ali & sanskar urja team members esakal
जळगाव

रेल्वेस्थानकावर सापडलेला मुलगा अखेर आईच्या कुशीत; कुटुंब नेपाळला रवाना

देवीदास वाणी

जळगाव : येथील रेल्वेस्थानकावर (Railway station) सापडलेला मुलाला अखेर १३ दिवसांनंतर संस्कार ऊर्जा सेवा संस्थेच्या सदस्यांच्या मदतीने आपल्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. (boy found at railway station is returned to his mom by sanskar urja team Jalgaon News)

काही दिवसांपूर्वी संस्थेला जळगाव रेल्वेस्थानकावर मोहंमद मगसूद अली हा १४ वर्षीय मुलगा भांबावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याचे वडील तय्याब अली ७ वर्षांपासून कुवैत येथे हातमजुरी करतात. आई नेपाळमध्ये राहते. त्याचा एक भाऊ दिव्यांग आहे.

मुलाला धुळे येथील मदरशात शिक्षणासाठी पाठविले होते, पण मुलाला आपल्या घरी परत जायचे होते. तो कोणाला काही एक न सांगता मदरशातू निघून गेला. संस्कार ऊर्जा सेवा संस्थेचे सदस्य योगानंद कोळी यांना जळगाव रेल्वेस्थानकावर तो फिरताना आढळला आला. त्याची विचारपूस करून बालगृहाला सुरक्षित ठिकाणी दाखल केले. त्यानंतर १३ दिवसांनी मुलाला सुखरूप आईच्या स्वाधीन करण्यात आले. मुलाच्या आईने संस्थेचे आभार मानले. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सपना श्रीवास्तव, सदस्य योगानंद कोळी या वेळी उपस्थित होते.

‘संस्कार ऊर्जा’चे उल्लेखनीय कार्य

भंगार गोळा करणारे, नशा करणारे, वाट चुकलेले किंवा फसवून आणलेल्या मुलांसाठी संस्कार ऊर्जा सेवा संस्था काम करीत आहे. आतापर्यंत २५ मुलांना योग्य ठिकाणी पोचविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Kolhapur Dussehra : कोल्हापूरसाठी 'हा' कसला मानाचा तुरा, म्हणे राज्याचा प्रमुख महोत्सव; शाही दसऱ्यासाठी निधीच नाही

World Wrestling Championship 2025 : भारताच्या सुजीतची कडवी झुंज अपयशी, ऑलिंपिक विजेत्या रहमानचा ६-५ने विजय

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

SCROLL FOR NEXT