Shahbad Maniyar Sakal
जळगाव

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ टाकल्याचा राग आल्याने मुलास लोखंडी रॉडने जबर मारहाण

व्हिडिओ तयार करून इस्टाग्रामवर टाकत असल्याच्या रागातून सोळा वर्षाच्या मुलाला तीन ते चार जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

व्हिडिओ तयार करून इस्टाग्रामवर टाकत असल्याच्या रागातून सोळा वर्षाच्या मुलाला तीन ते चार जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.

जळगाव - व्हिडिओ (Video) तयार करून इस्टाग्रामवर (Instagram) टाकत असल्याच्या रागातून सोळा वर्षाच्या मुलाला (Child) तीन ते चार जणांच्या टोळक्याने (Gang) लोखंडी रॉडने मारहाण (Beating) करून जखमी केल्याची घटना घडली. शाहदाब गफ्फार मणियार (१६ रा. टिपू सुलतान चौक, तांबापुरा) असे गंभीर जखमीचे (Injured) नाव आहे. जखमीच्या जबाबावरून हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

शाहदाब गफ्फार मणियार हा त्याच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करून ते इस्टाग्रामवर अपलोड करत असतो. त्याने तयार केलेल्या व्हिडिओचा समीर हनिफ काकर या तरुणाला राग होता. त्यामुळे त्याने शाहदाबकडे खुनशी नजरेने बघत त्याला दमदाटी केली होती. शुक्रवारी (ता. ११) फेब्रुवारीच्या रात्री समीर काकर व त्याच्या इतर साथीदारांनी त्याला घराबाहेर बोलावले.

शाहदाब घराबाहेर येताच त्याला समीर काकर याने हातातील लोखंडी रॉडने हल्ला चढवून जबर मारहाण केली. जखमी शादाबचा जबाब नोंदवल्यावर समीर काकर व त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी समीर काकर याला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT