Tushar Patil  esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime: धरणातील गाळ टाकण्याच्या परवानगीसाठी मागितली लाच; लिपिकाविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe Crime: मन्याड धरणातील गाळ शेतामध्ये टाकण्याच्या परवानगीसाठी १३ हजार ३०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी येथील पाटबंधारे उप विभाग कार्यालयातील लिपिकाविरोधात धुळे येथील लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. (bribery case was registered against irrigation clerk jalgaon crime news)

तक्रारदार शेतकरी वेहेळगाव (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथील रहिवासी असून त्यांच्या आजोबांच्या शेतजमिनीत मन्याड धरणातून गाळ टाकण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून त्यांच्यासह ११ शेतकऱ्यांनी आवश्‍यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन येथील पाटबंधारे उपविभाग कार्यालयाच्या उपविभागीय अभियंत्यांकडे अर्ज केला होता.

हा अर्ज केल्यानंतर कार्यालयातील लिपिक तुषार अशोक पाटील (३६) याने तक्रारदाराला फोन करून त्यांच्याकडे १३ हजार ३०० रुपयांची लाच मागितली. मात्र, ही रक्कम तक्रारदाराने लगेचच न दिल्यामुळे तुषार पाटील यांनी त्यांच्याकडे तगादा लावला. त्यामुळे तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दूरध्वनीवरुन माहिती दिली.

त्यावरुन धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने चाळीसगावला जाऊन तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, लिपिक तुषार पाटील याने १३ हजार ३०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे सफ्ष्ट झाल्याने त्याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला.

ही कारवाई धुळे येथील पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे यांनी सहकारी पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, रूपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागूल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण पाटील, प्रवीण मोरे, सुधीर मोरे, जगदिश बडगुजर यांच्या पथकाने केली. दरम्यान, या प्रकरणी पाटबंधारे विभागातील अधिकारींचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT