पाचोरा (जि. जळगाव) : रक्षाबंधनासाठी बहिणीला घेण्यासाठी आलेल्या भावास बहिणीचा गळफास घेतलेला मृतदेह दिसल्याने भावाने हंबरडा फोडत बहिणीची आत्महत्या नसून सासरच्यांनी तिची हत्या केल्याचा आरोप केला व सासरच्यांना कठोर शिक्षेची मागणी हुंदके देत केली. (brother came to celebrate Raksha Bandhan saw dead body of his sister nashik Latest marathi news)
भोपाळ (मध्य प्रदेश ) येथील प्रिया देव (वय २६) हिचा विवाह पाचोरा येथील गणपतीनगरातील रहिवासी व एमएसएफ सेवेत कार्यरत असलेले विनोद सुरवाडे यांच्याशी गेल्या ३० ऑगस्ट २०२१ ला झाला होता. विवाहानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून अनेकदा खटके उडत असत. त्याबाबत प्रियाने आपल्या माहेरच्यांना कल्पना दिली होती.
विनोद व प्रिया यांच्यात रविवारी (ता. ७) सकाळपासूनच भांडण सुरू झाले. याबाबत प्रियाने आपली बहिण दीपाली हिला मोबाईलवरून कल्पना दिली. दीपालीने आपल्या भावासही तसे कळवले. भाऊ देवेन देव त्याने येत्या दोन, तीन दिवसांवर रक्षाबंधन आहे, त्यासाठी प्रियाला घेऊन येऊ व तिच्या पतीसह सासरच्या समजवू, असा विचार केला व देवेन देव आपले मेहुणे शशांक शेजवाल यांना घेऊन रविवारी (ता. ७) रात्री पाचोरा येण्यास निघाले.
आम्ही येत आहोत, असे त्याने बहीण प्रियालाही कळवले होते. देवेन व शशांक हे दोघे सोमवारी (ता. ८) पहाटे पाचोरा येथे पोहोचले. याच वेळी विनोदची मामी प्रियाला उठविण्यासाठी गेली असता प्रिया गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसली.
याच वेळी मृत प्रियाचे भाऊ व मेहुणे हे घरी पोहोचले. बहिणीला घेण्यासाठी आलो आणि तिचा मृतदेह पाहायला मिळाला हे पाहून भाऊ देवेन याने हंबरडा फोडला व बहीण आत्महत्या करूच शकत नाही, तिची हत्या झाल्याचा आरोप करत त्याने चौकशी व कारवाईची मागणी केली.
भाऊ देवेनने फोडला हंबरडा
विवाहानंतर प्रियाचा पतीकडून छळ होत होता, असे देवेनने सांगितले. बहिण प्रिया आत्महत्या करूच शकत नाही, तिची सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप देवेनने केला. बहिणीला घेण्यासाठी आलो आणि तिचा मृतदेह पाहायला मिळाला हे पाहून भाऊ देवेन याने हंबरडा फोडला. याबाबत पोलिस आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.