brother in law married widowed sister in law jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : दिराने दिला विधवा वहिनीला आधार; ठाकूर समाजातील ठरला आदर्श विवाह!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील कोळी गल्लीतील किरण पाटील या दिराने आपली विधवा वहिनी छाया यांच्याशी विवाह करून त्यांच्या जीवनाला आधार दिला.

आपल्या भावाच्या दोन्ही मुलांना पितृछत्र देणाऱ्या किरण पाटीलच्या या आदर्श विवाहाबद्दल किरण व छाया यांचा ठाकूर समाजातर्फे सत्कार करण्यात आला. (brother in law married widowed sister in law jalgaon news)

याबाबत माहिती अशी, येथील आनंदा महादू पाटील यांच्या कुटुंबात क्रूर काळाने घाला घातला. कुटुंबाचा आधारवड असलेल्या ३६ वर्षीय प्रवीण पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

या निधनामुळे पत्नी व दोन मुले पोरकी झाली. अशा परिस्थितीत विधवा वहिनी व आपल्या दोन्ही पुतण्यांना वडिलांचे प्रेम देण्यासाठी दीर किरण यांनी धाडसी निर्णय घेतला व आपल्या विधवा वहिनी छाया (वय ३२) यांच्याशी विवाह केला.

दुर्गेश (वय १४) व तृप्ती (वय १२) यांना वडील मिळाले. प्रतिकूल परिस्थितीत आपली सून समाजात विधवा म्हणून वावरण्यापेक्षा सौभाग्यवती म्हणून घरची लक्ष्मी राहावी, यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी देखील या निर्णयाला बळ दिले. आजही भारतीय संस्कृतीत विवाह संस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पती-पत्नी हे संसाररुपी रथाचे दोन चाके मानली जातात. यातील एक चाक निखळल्यानंतर संसाराचा रथ बिथरतो. असाच आपल्या दिवंगत भावाच्या संसाररुपी रथाचे चाक बनलेल्या किरण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपल्या विधवा वहिनीशी विवाह करून समाजापुढे त्यांनी जणू एक आदर्श घालून दिला असून त्यांच्या या धाडसी निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या विवाह सोहळ्याप्रसंगी कुटुंबासह समाजबांधव, नातेवाईक तसेच ठाकूर समाजाचे अध्यक्ष सुनील ठाकूर, पिंटू ठाकूर, जितेंद्र ठाकूर, अमोल ठाकूर, मंगेश ठाकूर, मयूर ठाकूर, चंदू खाडे व मित्र परिवार उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT