murder news esakal
जळगाव

पत्नीसोबत झोपण्याची मागणी करताच भावाने भावाला संपवले

दिपक कच्छवा

मेहुणबारे (जि. जळगाव) : दारूच्या नशेत वाईट साईट शिवीगाळ करून पत्नीजवळ झोपू दे असे सांगितल्याचा राग अनावर झाल्याने सख्या मोठ्या भावाने लहान भावाचा डोक्यात लोखंडी पास टाकून खून केल्याची खळबळजनक घटना अभोणे येथे शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.

याप्रकरणी मेहूणबारे पोलीस स्टेशनला आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुलाच्या विरोधात मुलाचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता 1 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Brother killed brother as soon as he demanded to sleep with his wife Jalgaon Crime Latest marathi news)

या घटनेची पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अभोणे (ता.चाळीसगाव)येथील सुरेश तुकाराम पाटील व शिवाजी तुकाराम पाटील या सख्ख्या भावांमध्ये आपसात जमत नसल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत असत. त्यामुळे शिवाजी हा 5 महिन्यापासून कुटुंबासह कळमडू येथे राहात होता.

अभोणा येथे असतांना या दोघांमध्ये बऱ्याच वेळा हाणामाऱ्या झाल्या होत्या. त्यामुळे नागरिक देखील भांडणतंटा सोडवायला येत नसत. गुरुवार (ता. 25) रोजी शिवाजी पाटील हा रात्री 10 वाजता सुरेश पाटील याच्या घरी आला व काहीएक कारण नसतांना वाद घालून शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली.

त्यामुळे सुरेश, त्याची आई,पत्नी व मुले हे गावातील एका व्यक्तीच्या घरी गेले. त्यानंतर शिवाजी हा कळमडू येथे चालला गेला.त्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता. 26) रोजी सकाळी 7 वाजता शिवाजी हा परत अभोेणे येथे दारू पिऊन आला व मोठा भाऊ सुरेशशी वाद घालू लागला.त्याला समजावून सांगूनही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.दिवसभर दारू पिऊन यायचा व सर्वांना शिवीगाळ करायचा. दिवसभरात 4 ते 5 वेळा हा प्रकार घडला.

त्यानंतर सायंकाळी साडे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान सुरेश हा पेाळ्यानिमीत्त बैल गावातून मिरवून घरी आला तेवढ्यात लहान भाऊ शिवाजीने दारू पिवून सुरेशला शिवीगाळ केली. त्यावेळी सुरेशने त्याला समजावत तु कळमडू येथे घरी जा असे सांगितले. मात्र मी आज घरी जाणार नाही,येथेच मुक्काम करणार आहे.

मला तुझ्या पत्नीजवळ झोपू दे असे म्हणताच संतापलेल्या सुरेशने ओट्यावर पोळानिमीत्त पूजेकरीता ठेवलेली लोखंडी पास शिवाजीच्या डोक्यावर, तोंडावर मारली. या मारहाणीत जबर मार लागल्याने शिवाजी हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. काही वेळाने रूग्णवाहिका आल्यानंतर शिवाजी याला ग्रामीण रूग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासुन मृत घोषित केले.

याप्रकरणी मृत शिवाजीची आई लताबाई तुकाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश तुकाराम पाटील याचे विरूद्ध मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड हे करीत आहेत. दरम्यान संशयित आरोपी सुरेश तुकाराम पाटील यास अटक केली आहे. आज त्यास चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता 1 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT