anganwadi
anganwadi esakal
जळगाव

Jalgaon News : अंगणवाडीसाठी इमारत मंजूर, मात्र जागाच मिळेना; जिल्‍ह्यातील चित्र!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरवात अंगणवाड्यांतून होते. जिल्ह्यात तीन हजार ६४१ पैकी तीन हजार १५४ अंगणवाड्यांना हक्काची जागा आहे.

२३५ अंगणवाड्यांचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. (Building approved for Anganwadi but no space available for building jalgaon news)

मात्र, जिल्ह्यात ९० अंगणवाड्यांसाठी जागाच मिळत नसल्याचे चित्र आहे. जागेच्या अडचणींमुळेच ९० अंगणवाड्यांच्या कामांना खीळ बसली आहे. जिल्ह्यात अंगणवाड्या व शाळांसाठी बालाप्रकल्प राबविला जात आहे. त्यामुळे अंगणवाड्यांचे चित्र बदलत आहे.

मात्र, जिल्ह्यात आजही ३५ अंगणवाड्या भाडेतत्त्वाच्या इमारतीत भरत आहेत. या अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारतीची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात जवळपास ४५० अंगणवाड्यांना इमारती नाहीत. बहुतांश ठिकाणी शाळेच्या आवारात किंवा शाळेच्या ठिकाणी अंगणवाडी भरतात.

जिल्ह्यात एकूण नव्याने २८९ अंगणवाड्यांच्या बांधकामांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी २३५ अंगणवाड्यांचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात आले. ९० अंगणवाड्यांना आता जागा मिळत नसल्याने व ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देत नसल्याने अडचणी येत आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

२०६ अंगणवाड्या होणार वर्ग

जिल्ह्यात २०६ अंगणवाड्या महापालिका व पालिका क्षेत्रात वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील भडगाव येथील ३९, भुसावळ- ३२, बोदवड- २३, मुक्ताईनगर- २७, जळगाव- ३०, जामनेर- ४९, पाचोरा- एक, यावल- चार, अशा अंगणवाड्यांचा समावेश आहे. या अंगणवाड्या आता शहरी भागाला जोडल्या जाणार आहेत.

मंत्र्यांच्‍या तालुक्‍यातच जागा मिळेना

जिल्ह्यातील ९० अंगणवाड्यांना जागा मिळत नसून त्यातील सर्वाधिक ४० अंगणवाड्या जामनेरसह शेंदुर्णी भागातील आहेत. यावल तालुक्यातील १९ अंगणवाड्यांनाही जागा मिळत नाही.

ग्रामपंचायत व पालिका हद्दीत या अंगणवाड्यांसाठी जागा मिळत नसल्याने स्थानिक पातळीवर सरपंच व आमदारांकडून प्रयत्न होण्याची गरज आहे. मंत्र्यांच्याच तालुक्यात अंगणवाड्यांना जागा मिळत नसल्याची स्थिती आहे. सध्या स्वत:ची इमारत नसलेल्या ठिकाणी समाजमंदिर, शाळा याठिकाणी अंगणवाडी भरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT