Burglary esakal
जळगाव

Jalgaon Crime : चोपड्यात घरफोडी; सोन्यासह रोकड लंपास

सकाळ वृत्तसेवा

चोपडा (जि. जळगाव) : शहरातील त्र्यंबकनगर व सहकार कॉलनी या दोन ठिकाणी भर दिवसा चोरट्यांनी (Thieves) बंद घरे फोडली (Burglary) असून दोन्ही घरातून १२ तोळे सोने (Gold) व अडीच लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. (burglary in Chopda Cash stolen with gold jalgaon crime news)

सविस्तर वृत्त असे, की त्र्यंबकनगर भागातील रहिवासी संतोष सोनवणे यांच्या घरात दुपारी १ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करून तब्बल ५ तोळे सोने व ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. त्यांनी नुकतेच सोसायटीच्या माध्यमातून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. दोन वाजेच्या सुमारास सहकार कॉलनीतील रहिवासी कैलास रामदास वाघ यांच्या बंद घराचे कुलूप तोडून तसेच कपाटातील ७ तोळे सोने व १ लाख ७५ हजार रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. एकाच दिवशी भर दिवसा दोन घरफोड्या झाल्याने पोलिसांपुढे चोर पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सदर घटनास्थळी श्वान पथकास खास पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांनी हजेरी लावून काही सुगावा मिळतोय काय याची तपासणी केली. सदर घटनेचा अधिक तपास चोपडा शहर पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Loni Kalbhor crime news: विषारी रासायनिक ताडी प्रकरणात लोणी काळभोरमध्ये आई-मुलगा अटकेत; घातक स्फटिकांसह मुद्देमाल जप्त

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT