Burglary News esakal
जळगाव

Crime Update : कासोद्यात चोरट्यांची दिवाळी; अडीच लाख रकमेवर डल्ला

सकाळ वृत्तसेवा

कासोदा (ता. एरंडोल) : दिवाळीनिमित्त कुटुंबासह कुलदैवताच्या दर्शनासाठी गेलेल्या किराणा दुकानदाराच्या घरी चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारत २ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी (ता. २८) सकाळी साडेसात ते सायंकाळी सातदरम्यान घडली.

येथील सिद्धार्थनगरमधील विजय शिवाजी वारे याच परिसरात घराच्या पुढील भागात किराणा दुकान चालवतात. सध्या दिवाळी असल्याने व्यवसाय चांगला झाल्याने त्या मालाच्या विक्रीतून जमलेली १ लाख २० हजार रुपये व काही दागिने बँकेत ठेवून त्यावर कर्ज घेऊन १ लाख २० हजार रुपये असे एकूण २ लाख ४० हजार रुपये घेतलेल्या मालाच्या उधारीचे व्यापाऱ्यांना देण्यासाठी रक्कम घरात आणून ठेवली होती.(Burglary in day Thieves theft amount of two and a half lakhs Jalgaon Crime News)

परंतु विजय वारे हे कुटुंबासह दिवाळीनिमित्त गुरुवारी (ता. २८) सकाळी साडेसातला मध्य प्रदेशातील सेंधवा येथील कुलदैवत बिजासन माताच्या दर्शनासाठी वाजता घराला कुलूप लावून गेले होते.

संध्याकाळी सातला घरी परत आले असता त्यांना घराच्या दरवाजाची कडी वाकलेली व कुलूप तोडलेले दिसले, त्यांनी लागलीच घराचा दरवाजा उघडून रक्कम ठेवलेल्या स्वयंपाक खोलीत जावून बघितले असता रक्कम ठेवलेला डबा उघडा दिसला. त्यामुळे विजय वारे यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत कासोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार सहदेव घुले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT