Crime News
Crime News sakal
जळगाव

Jalgaon Crime News : विद्यार्थ्यांच्या खोलीत चोरट्यांचा डल्ला; जिल्‍हापेठच्या हद्दीत घरफोड्या

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील रिंग रोड अजय कॉलनीत अभियंता तरुणाच्या खोलीतून लॅपटॉप, मोबाईल, घड्याळसह रोकड लांबविले. दुसऱ्या घटनेत खानदेश मिल कॉलनीतील चार्टर्ड अकाऊंट तरुणाच्या खोलीतून दोन मोबाईल चोरून नेले. (Burglary in students rooms in district limits jalgaon crime news)

बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळा येथील मूळ रहिवासी, अभियंता सौरभ अनिल वाळेकर जळगाव शहरातील अजय कॉलनीत वास्तव्यास आहे. सोमवारी (ता. २९) दुपारी तीन ते सहाच्या दरम्यान सौरभ झोपला असताना, त्‍याच्या खोलीतून लॅपटॉप, मोबाईल, घड्याळ व अडीच हजारांची रोकड, असा एकूण २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला.

सायंकाळी सहाला उठल्यानंतर सौरभला त्याचा खोलीत ठेवलेला मोबाईल, लॅपटॉप, घड्याळ व रोकड दिसली नाही. चोरीची खात्री झाल्यावर सौरभ याने रात्री साडेनऊच्या सुमारास दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक शरीफ शेख तपास करीत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुसऱ्या घटनेत कलाभवनाच्या पाठीमागे राहत असलेल्या कौशल सुनील जैन (वय २३) यांच्या खोलीतून रविवारी (ता. २९) मध्यरात्री चोरट्यांनी १४ हजार रुपयांचे दोन मोबाईल चोरून नेले. कौशल जैन याच्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संदीप पाटील तपास करीत आहे.

विद्यार्थ्यांच्या खोल्या टार्गेटवर

उच्च शिक्षणासाठी जळगाव शहरातील महाविद्यालयांच्या जवळपास असलेल्या खोल्यांमध्ये भाड्याने राहतात. बहुतांश विद्यार्थी शनिवारी व रविवारी गावी निघून जात असल्याने त्यांच्या बंद खोल्या चोरट्यांनी टार्गेट केल्या आहेत.

उकाड्याला त्रासून रात्री खोलीचे दार उघडे करून झोपणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खोल्यातून मोबाईल, लॅपटॉप आणि महागड्या वस्तू चोरीला जात असल्याचे प्रकार वाढले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT