Campaign For Student Growth
Campaign For Student Growth esakal
जळगाव

Campaign for student growth : महापालिका शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचा अहवाल मागविला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिका शाळेत अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचा अहवाल मागविण्यात आला आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत शिक्षण विभागाला कळविण्यात येईल, अशी माहिती आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

महापालिका शाळांची संख्या सद्यःस्थितीत घटली आहे. ५१ शाळांवरून आज केवळ २३ संख्या झालेली आहे. त्यात मराठी माध्यमाच्या १२, ऊर्दू माध्यमाच्या १०, तर हिंदी माध्यमाची एक शाळा आहे. यात साडेचार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर महापालिकेकडे तब्बल १७५ शिक्षक आहेत. (Campaign for Student growth Report additional teachers in municipal schools has been called for Jalgaon News)

शासनाच्या रेशोनुसार ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे. त्यानुसार १५० शिक्षकांची गरज आहे. त्यामुळे तब्बल २५ शिक्षक अतिरिक्त ठरत असून, त्याचा १५ ते १६ लाख रुपयांचा दरमहा बोजा महापालिकेवर पडत आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते.

महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी याबाबत सांगितले, की महापालिका शिक्षण विभागाकडून विद्यार्थी व शिक्षकसंख्येचा अहवाल आपण मागविला आहे. अहवाल आल्यानंतर त्याची पडताळणी करून शिक्षक अतिरिक्त ठरत असेल तर त्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे समायोजन करण्याबाबत आदेश देण्यात येतील. तसेच महापालिका शाळेत विद्यार्थी वाढविण्यासाठीं लवकरच अभियान राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT