accident esakal
जळगाव

गुरांना वाचविताना झाडावर आदळली कार; तिघांचा जागीच मृत्यू

गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात निंबाच्या झाडावर आदळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

भडगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील पळासखेड्याजवळ भरधाव जाणारी कार समोरून येणाऱ्या गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात निंबाच्या झाडावर आदळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. या बाबत भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पळासखेडा येथून होंडाई कारने किसन राठोड, पवन राठोड, जितेंद्र पवार हे तिघेही तरवाडे गावाकडे भरधाव वेगात जाताना रस्त्यावर समोरून येणाऱ्या गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात असताना वाहनाचा वेगाचा अंदाज न आल्याने ही कार रस्त्याच्या बाजूस असलेले निंबाच्या झाडावर आदळल्याने कारमधील किसन लखीचंद जाधव (वय ४०, रा. गाळण, ता. पाचोरा), पवन इंदल राठोड (वय २६, रा. गाळण, ह. मु. टिटवाळा, ता. कल्याण), जितेंद्र काशिनाथ पवार (रा. ठाकुर्ली, ता. कल्याण, जि. ठाणे) या तिघांच्या डोक्यास व हातापायाला जबर मार लागला. त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे दाखल केले असता तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या बाबत सुनील वसंतराव राठोड (रा. गाळण, ता. पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

Chhatrapati Sambhajinagar: शेतकरी महिला चढली पाण्याच्या टाकीवर; फेर रद्दच्या मागणीसाठी आंदोलन; पैठण तहसील परिसरातील प्रकार

SRH vs RR, Eliminator: हैदराबाद की राजस्थान, आज कोण होणार 'एलिमिनेट'? पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने ७५ वर्षीय महिलेला उडवलं, चालक अपघातानंतर फरार

Konkan Railway: ब्रिटिशांनाही अशक्य वाटलेली कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणणारे मधु दंडवते, सावंतवाडी स्थानकाला नावासाठी अनेक वर्षे संघर्ष

SCROLL FOR NEXT