Death news esakal
जळगाव

Jalgaon News : सुतार व्यावसायिकाची पाचोरा येथे आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : येथील भडगाव रोड भागातील शांतीनगरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या ३२ वर्षीय सुतार व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

गाळण खुर्द (ता. पाचोरा) येथील सचिन वाडेकर सुतारी कामानिमित्त गेल्या काही महिन्यांपासून शांतीनगरात भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. त्यांचे कुटुंबीय गाळण येथे नातलगांच्या वैवाहिक सोहळ्यासाठी गेल्याने ते घरात एकटेच होते. (Carpenter professional Suicide at Pachora Jalgaon News)

हेही वाचा: प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

सोमवारी (ता. ६) पहाटे त्यांनी वरच्या मजल्यावरील खोलीत जाऊन गळफास घेतला. त्यांचा सहकारी त्यांना बोलवण्यासाठी आला असता त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. घरमालकांनी पोलिसांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

रुग्णवाहिका चालक बबलू मराठे यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणल्यावर डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येमागील कारण गुलदस्त्यात असून, त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. पोलिस नाईक दिलीप वाघमोडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: सीएसएमटी-गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमके कारण काय?

Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या इमारतीवर डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा फलक; अधिकारी गैरहजर अन् पोलिसांसमोरच चिटकवली अक्षरे, नामकरणावरून गोंधळ सुरु

Numerology: लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे असतात 'या' ३ जन्मतारखा असलेले लोक; करिअरमध्ये मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वंचितांचा आवाज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Solapur Road Accident: एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; बस चालकासह एका प्रवाशी महिलाचा मृत्यू ; दहा जण जखमी

SCROLL FOR NEXT