Jalgaon Crime News esakal
जळगाव

नराधमाने महिलेवर अत्याचार करीत बनविली चित्रफित; गुन्हा दाखल

संदीप पाटील

पिंपळगाव हरेश्‍वर (जि. जळगाव) : महिलेला दुचाकीवर बळजबरी बसवून शेतात नेत तोंडात बोळा कोंबून अमानुष अत्याचार (rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर नराधमाने अत्याचार केल्याचा व्हिडिओ (Video) देखील बनविला असल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Case Filed against one for Made video of woman raping and torturing Jalgaon Crime News)

पाचोरा तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिला, तिचा भाऊ व मुलासह वास्तव्याला आहे. ती पाच जूनला रात्री नऊच्या सुमारास घरी एकटी असताना संशयित आबा अंबादास कोळी (रा. घोसला, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) याने दुचाकीवर येऊन ‘तुला तुझ्या बहिणीच्या घरी सोडतो’, असे सांगितले. याला नकार दिल्याने शिवीगाळ करून तुझ्या भावासह मुलाला मारून टाकेल, अशी धमकी देत तिला दुचाकीवर बळजबरी बसवून घेऊन गेला.

संशयिताने महिलेस त्याच्या सोयगाव शिवारातील शेतात नेऊन तोंडात कपडाचा बोळा कोंबून तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तर अत्याचाराचा व्हिडिओ देखील बनविला. त्यानंतर मारहाण करून खिशातील भिलावा दगडाने फोडून त्याचे तेल नको त्या ठिकाणी लावून छळ केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आबा आंबादास कोळी याच्याविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT