Demanding ransom of 4 crores by threatening witness jalgaon esakal
जळगाव

Jalgaon Crime News : ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या मुलासह 5 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जळगाव शहर व चाळीसगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमधील साक्षीदार तेजस रवींद्र मोरे (वय ३४, रा. जिल्हा परिषद कॉलनी, जळगाव) यांना धमकी देत चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी माजी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यासह त्यांचे पुत्र व अन्य तीन अशा पाच जणांविरुद्ध जळगावातील जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(case has been registered against 5 suspects including Adv Pravin Chavan son jalgaon crime news)

जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार ॲड. चव्हाण यांच्याविरोधात जळगाव शहर व चाळीसगाव पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत. यात तेजस मोरे हे साक्षीदार असून, त्यात त्यांचा जबाबही झाला आहे, ही बाब ॲड. चव्हाण यांना माहीत झाल्यावर मोरे यांनी साक्ष देऊ नये, यासाठी त्यांची तीन संशयितांमार्फत समजूत घालण्यात आली.

मात्र, मोरे त्यास तयार झाले नाहीत. त्यामुळे दीड ते दोन महिन्यांपूर्वी मोरे मुंबई ते पुणे प्रवास करीत असताना त्यांचे वाहन अडवून तुला जीवंत सोडणार नाही म्हणजे साक्ष फिरविण्याचा प्रश्नच राहणार नाही, अशी धमकी तक्रारीत नमूद तिघांनी दिली.

त्या वेळी भीतीपोटी मोरे यांनी सहमती दर्शवून वेळ मारून नेली. मोरे दहशतीखाली आल्याची खात्री झाल्याने संशयितांनी तरीही तुला जिवंत राहायचे असेल तर ॲड. चव्हाण यांना न्यायालयाच्या खर्चासाठी चार कोटी द्यावे लागतील, अशीही धमकी दिली.

तेजस यांना जिवाची भीती...

तेजस मोरे हे गुरुवारी (ता. १६) रात्री जळगावातील घरासमोर जेवणानंतर फिरत होते. याच वेळी चार संशयितांनी त्यांना गाठले. तेजस यांच्याजवळ येत चार कोटी आताच दे, नाही तर तुला जिवे ठार मारतो, अशी धमकी दिली. मोरे यांनी आरडाओरड केली असता चार जण पळून गेले.

त्यानंतर त्यांच्या मित्रामार्फत मोरे यांना समजले, की ॲड. चव्हाण समोर न येता त्यांच्या मुलाच्या सांगण्यावरून तीन जणांना हाताशी धरून धमकी देत चार कोटी रुपयांची खंडणी मागण्याची योजना तयार केली आहे. परिणामी, ही मंडळी मारून टाकतील, या भीतीपोटी तेजस मोरे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रारीनुसार ॲड. प्रवीण पंडित चव्हाण, त्यांचा मुलगा व धमकी देणारे तीन जण अशा पाच जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक मीरा देशमुख तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

Mumbai Local Megablock: रविवारी रेल्वे प्रवाशांना फटका बसणार, मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक; वेळापत्रकात बदल

Beed Lawyer News: सरकारी वकिलाने जीव दिल्याच्या प्रकरणात न्यायाधीशावर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT