case of atrocity has been filed against those who removed  statue jalgaon crime news
case of atrocity has been filed against those who removed statue jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon News : पुतळा काढणाऱ्यांवर ॲट्रासीटीचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील जिल्‍हा रुग्णालयासमोरील खासगी जागेत बसविलेल्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर, भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा हटविणाऱ्यांवर जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात ॲट्रासीटीचा (Atrocity) गुन्हा दाखल झाला आहे. (case of atrocity has been filed against those who removed statue jalgaon crime news)

शहरातील जिल्‍हा रुग्णालय व बी. जे. मार्केटसमोरील गट क्रमांक १८३ जुना सिटी सर्वे क्रमांक २६६१ व नवीन ११८/१, ११८/२ या जागेवर पूर्वी बौद्ध वसाहत असताना, १९८३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे पुतळे उभारले होते. वसाहत उठविल्यानंतरही ते पुतळे कायम होते.

गुरुवारी (ता. १६) सकाळी सहाच्या सुमारास प्रशांत शरद देशपांडे, अमित एकनाथ पाटील व इतरांनी विनाक्रमाकांचा जेसीबी आणून कंपाऊंड वॉलचे गेट तोडत आत प्रवेश केला. याबाबत माहिती मिळताच अमर सोनवणे, शांताराम सोनवे, मिलिंद शिरसाठ, सतीश गायकवाड, विजय निकम आदींच्या देखत आणि पोलिसांच्या उपस्थितीत दोन्ही पुतळे काढून नेले.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

पुतळे काढल्याचे कळताच बौद्ध समाजबांधव व आंबेडकरप्रेमी जनता एकवटत असताना, प्रशांत देशपांडे व त्याच्या साथीदारांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. याप्रकरणी सुजाता ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रशांत देशपांडे व त्याच्या साथीदारांवर ॲट्रासीटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधितांवर कारवाईची मागणी

दलित झुंजार नेते राजाराम गाढे यांच्या नेतृत्वाखाली या पवित्र पुतळ्यांची स्थापना त्या काळी करण्यात आली. असे असताना, हे पुतळे हटविण्याचा घाट प्रशासनाने घातला. त्यासंबंधी आदेश देणारे प्रशासनातील अधिकारी, तसेच पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीने केली आहे. तसेच हा पुतळा पुनर्स्थापित करण्यात योगदान देणाऱ्या चंद्रमणी तायडे यांचा पक्षाचे संपर्कप्रमुख राजू मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: काँग्रेसने 'कलम 370'ला आपल्या अवैध मुलाप्रमाणे सांभाळलं; अमित शाहांची बोचरी टीका

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT