Maharashtra forest department Sakal
जळगाव

Jalgaon News : अवैध उत्खनन प्रकरणी वनविभागाकडून तिघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : वनपरिक्षेत्रातील बिलाखेड येथे अवैध गौण खनिज उत्खनन करताना आढळून आलेल्या तिघांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी कारवाईत त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर एक जेसीबीसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चाळीसगाव वनपरिक्षेत्रात अवैधरीत्या उत्खनन होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. (Case of illegal mining Three arrested by forest department Jalgaon News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

त्यावरून वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग (जळगाव) व सुदर्शन शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे जुवार्डीचे वनपाल आर. व्ही. चौरे, वनरक्षक योगेश देशमुख, आर बी. पवार, के. बी. पवार, सी. व्ही. पाटील, वनमजूर बाळू शितोळे, बटू अहिरे, दिनेश कुलकर्णी, वाहन चालक राहुल मांडोळे यांच्या पथकाने बिलाखेड येथे जाऊन कक्ष क्रमांक ६०४४ मध्ये अवैधरीत्या वन विभागाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून जेसीबीच्या साह्याने मुरुमाची विल्हेवाट लावली जात असल्याचे दिसून आले.

यावेळी पथकाने रवींद्र भीमराव गायकवाड, शंकर राजेंद्र कोळी, परशुराम ताराचंद पवार या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली. या कारवाईत दोन ट्रॅक्टर एक जेसीबी जप्त करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave Alert : जानेवारीतही थंडीची लाट राहणार; पुढच्या तीन महिन्यांचा हवामान अंदाज आला समोर

Latest Marathi News Live Update : बंडखोरी करणाऱ्यांना शांत करण्यासाठी भाजपश्रेष्ठींनी घेतला पुढाकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले सक्रिय

बॉलिवूडच्या खलनायकानं साकारलेली नायकाची भूमिका, 15 मिनिटात सिनेमा थिएटरमधून बाद, कोणता आहे 'तो' सिनेमा?

माेठी बातमी! राज्यातील दूध उत्पादक संकटात; खरेदी दरात सहा महिन्यांपासून वाढच नाही, पशुखाद्याचे दर वाढले

Vishwas Patil: ‘संभाजी’ पुस्तकातील चूक सुधारण्याची तयारी: संमेलनाध्यक्ष विश्वास पाटलांची स्पष्टोक्ती, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT