Crime News esakal
जळगाव

Crime Update : घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्यावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : घरगुती स्वयंपाकाचा गॅस वाहनांमधे इंधन म्हणून बेकायदा भरणाऱ्या संशयितांना साहित्यासह ताब्यात घेत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इमरान शेख समद (रा. रथ चौक, जळगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर जळगाव टोलनाक्यासमोर बेकायदा स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरमधून वाहनात इंधन म्हणून भरण्यात येत असल्याची गुप्त माहिती गुन्हेशाखा निरीक्षक किशनराव नजन-पाटील यांना मिळाली होती.(Case Registered Against Person he fill domestic gas in vehicles Jalgaon Crime News)

त्यांच्या पथकातील जितेंद्र पाटील, महेश महाजन, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इग्रानअली सय्यद, सचिन पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

पोलिस पथकाने ताब्यात घेतलेल्या इमरान शेख समद याच्या कब्जातून चार सिलिंडर, सुस्थितीत सहा सिलिंडर, मोटरपंप, वजनकाटा असे २७ हजार ७०० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस नाईक नितीन बाविस्कर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

MI vs RR Live: बाहेर एवढं थंड वातावरण कसं झालं? रोहित शर्माचा मजेशीर प्रश्न, तिलक वर्मा म्हणतो... Video; मॅचसाठी खेळाडू रवाना पण...

Latest Marathi News Live Update : श्री संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची शिकार प्रकरण उघड; 6 आरोपी ताब्यात

Pimpri Chinchwad News : महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमुळे रुग्णांना कमी खर्चात मिळतात उत्तम उपचार

SCROLL FOR NEXT