Crime News esakal
जळगाव

Jalgaon News : तत्कालीन 3 तहसीलदारांवर गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : येथील शासकीय धान्य गोदामात वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून रेशन धान्यसाठ्यात सात लाख २७ हजारांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन चार तहसीलदार, एक प्रभारी तहसीलदार, गोदाम व्यवस्थापकासह सहा जणांविरुद्ध भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered against then 3 tehsildars in case of malpractice Jalgaon news)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

भुसावळ येथे २०२० मध्ये शासकीय धान्य गोदामात तत्कालीन तहसीलदार विशाल नाईकवाडे, तत्कालीन तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तत्कालीन बोदवड तहसीलदार रवींद्र जोगी, प्रभारी तहसीलदार एस. यू. तावडे, तत्कालीन उपविभागीय अधिकारी कुमार चिंचकर, तत्कालीन गोदाम व्यवस्थापक आर. एल. राठोड यांनी संगनमताने गैरव्यवहार करून स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या साठ्यात ३९१.९२ क्विंटल रेशनचे धान्य गहू साखर, ज्वारी असा ७ लाख २७ हजार २४४ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ॲड. आशिष प्रमोद गिरी, मुंबई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, २० मे २०२० ला हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दिवाणी व फौजदारी न्यायालय भुसावळ यांच्याकडून कागदपत्र चौकशीसाठी पोलिस ठाण्याला प्राप्त झाल्याने त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संजय कंखरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

SCROLL FOR NEXT