esakal
जळगाव

Jalgaon News : लग्नात तलवार घेऊन नाचणे पडले महागात; नवरदेवावर गुन्हा दाखल..

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : लग्नाच्या वरातीत डीजेवर चिथावणी गाणे लावून तलवारीसह नाचणाऱ्या नवरदेव, डीजे मालक व इतर दोघांवर शस्र कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. (case registered against those dancing with swords in marriage jalgaon crime news)

भोईवाडा भागातील कोळी समाजाचे लग्नाची मिरवणूक मंगळवारी (ता. १६) दुपारी अडीचच्या सुमारास कसाली मोहल्ल्यातून जात असताना, चामुंडा डीजे चालक यशवंत शांताराम शिंगाणे (वय २७) याने ‘मंदिर वही बनायेगे’, ‘हर घर भगवा आयेगा’, ‘जय श्रीराम’, अशा घोषणा असलेले गाणे लावताच नवरदेव विकी गोपाल कोळी (वय २५) तलवार घेऊन खाली उतरला आणि नाचू लागला.

लागलीच किरण गोपाल कोळी (वय २४, रा भोई वाडा) व त्यांचा साथीदार विकी भाऊलाल कोळी (वय २७, रा. मांजरोद, ता. शिरपूर) तलवार घेऊन नाचू लागले. एका गटाला चिथावणी देत होते. त्याठिकाणी बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी जितेंद्र निकुंभे व होमगार्ड रवींद्र पाटील यांनी त्यांना चिथावणीखोर कृत्य करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

डीजे चालकाला गाणे बंद करण्यास सांगितले. मात्र, कोणीच ऐकून घेतले नाही, म्हणून निकुंभे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले.

पोलिस निरीक्षक विजय शिंदे, दीपक माळी, शरद पाटील, मिलिंद भामरे, शेखर साळुंखे, गणेश पाटील घटनास्थळी हजर झाले. त्यांनतर वरात भोईवाड्यात निघून गेली. निकुंभे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डीजेचालक, नवरदेव व इतर दोघे, अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे तपास करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT