Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : शाळांजवळ तंबाखू विक्री; विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील लोण खुर्द आणि निंभोरा येथे शाळांजवळ लहान मुलांना तंबाखू, सिगारेटसारख्या बंदी असलेले पदार्थ विकणाऱ्या तीन पानटपरी चालक विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered against tobacco sellers for selling tobacco near schools jalgaon crime news)

मारवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी शाळांजवळ विडी, सिगारेट तंबाखूविक्री करणाऱ्या पानटपरी चालकांवर गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे.

३१ ला मिळालेल्या माहितीवरून सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांच्या आदेशाने पोलिस कर्मचारी भरत ईशी, संजय पाटील, फिरोज बागवान, तुषार वाघ, भरत गायकवाड, सुनील आगोने यांनी लोण खुर्द येथे मुडी प्र. डांगरी रस्त्यावर जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ छापा टाकून मनवर शहा मेहबूब शहा फकिर (वय ६०) यांच्या महाराष्ट्र पानसेंटर, शाहरुख रशीद फकिर (वय २८) यांच्या गरीब नवाज पान सेंटर या दोन टपऱ्यांवर बिडी, सिगारेट, तंबाखू यासारखे बंदी असलेले पदार्थ मिळून आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर निंभोरा येथे कलाली रस्त्यावर जिल्हा परिषद शाळेजवळ दीपक सुभाष पाटील (वय ४७) यांच्या दीपक पान सेंटरवर देखील बिडी, सिगारेट, तंबाखू असे पदार्थ मिळून आले. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

KBC Contestant Arrest : 'कौन बनेगा करोडपती' मध्ये ५० लाख जिंकणाऱ्या तहसीलदाराला अटक धक्कादायक कारण आले समोर

Latest Marathi News Live Update : पेट्रोलवरील उत्पादन शुल्कातील कपात ही सरकारच्या अपयशाचे निदर्शक- खासदार सागरिका घोष

Hardik Pandya ची मन जिंकणारी कृती; मुंबईच्या ग्राऊंड्समन्सना केली आर्थिक मदत... कारण ऐकून वाढेल आदर...

Gold Rate Today: युद्धाचा आणि डॉलरचा सोन्यावर डबल इफेक्ट! मार्चमध्ये सोनं 30 हजारांनी स्वस्त; महाराष्ट्रात आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT