Thief opening cash box in Bank of Baroda ATM on Ring Road.
Thief opening cash box in Bank of Baroda ATM on Ring Road. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : एटीएम फोडूनही कॅश सुरक्षित!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील रिंग रोडवरील बँक ऑफ बडोदाचे एटीएम (ATM) मशीन फोडून रोकड चोरण्याचा प्रयत्न करताना भामटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. (Cash safe even after breaking ATM by thief jalgaon crime news)

रिंग रोडवरील बडोदा बँकेचे एटीएमच्या कॅबिनमध्ये बुधवारी (ता. १५) रात्री साडेअकराच्या सुमारास चोरटा शिरल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. चोरट्याने एटीएम मशीनच्या मागील बाजूची पाहणी केली. नंतर मशिनच्या कॅशबॉक्सचा पत्रा उघडून आतील एटीएम हाताने तोडण्याचा प्रयत्न केला.

एटीएम मशीन फोडण्यात अयशस्वी झाल्याने चोरटा पसार झाला. हा प्रकार गुरुवारी (ता. १६) सकाळी आठला उघडकीला आला. जिल्हापेठ ठाण्याचे पोलिस कर्मचारी समाधान पाटील आदी घटनास्थळी पोचले व त्यांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. याबाबत बँक मॅनेजर पवन मोंगळे यांच्या तक्रारीवरून रात्री जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

रोकड सुरक्षित

बडोदा बँकेच्या व्यवस्थापकांना माहिती कळताच त्यांनी वरिष्ठांना कळवून एटीएम देखभाल दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीला पाचारण केले. एटीएमच्या कॅशबॉक्सपर्यंत चोरटा पोचला. मात्र, ते तो उघडू शकला नाही. परिणामी, लाखो रुपयांची रोकड सुरक्षित असल्याचे तपासणीत आढळले.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

पोलिस गस्तावेळी चोरटा व्यस्त

जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यामागेच रिंग रोडवर बडोदा बँक असून, चोरटा साडेअकराच्या सुमारास एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना चित्रीत झाला आहे. एकतर पोलिसांची रात्रीची गस्त कागदावरच असते. त्यामुळेच चोरट्याने एटीएम फोडण्याचे धाडस केल्याचे बोलले जात आहे.

सप्ताहात दुसरी घटना

सप्ताहात कानळदापाठोपाठ जळगाव शहरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. बँकांना एटीएमवर सुरक्षारक्षक ठेवणे परवडत नसल्याने शहरातील बहुतांश एटीएम विनासुरक्षारक्षकच असून, पुरेशा उपाययोजनाही केलेल्या आढळत नाहीत. विशेष म्हणजे कानळदा आणि रिंगरोडच्या घटनेत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे अडाणी चोर असल्याने त्यांचा प्रयत्न फसला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळेंकडून दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT