रावेर (जि. जळगाव) : पाल (ता. रावेर) गावाजवळ अवैध निर्दयतेने ट्रकमध्ये सुमारे १५ गोवंश कोंबून कत्तलीसाठी नेत असताना, रावेर पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Caught a truck carrying cattle for slaughter in jalgaon district)
खरगोन-रावेर रोडवरील पालजवळील शेरी नाका ते आर्यन ढाब्यादरम्यान आयशर ट्रक (यूपी ८३, बीटी ८०२१) रावेरकडे येत असताना, रावेर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता, त्यात निर्दयतेने कमी जागेत कोंबून, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राशिवाय गायी कत्तलीसाठी घेऊन जात असताना आढळून आल्या. त्यात १५ गोवंश आढळून आले. यात २४ लाख किमतीचे ८ ते १० वर्ष असलेल्या जमी जातीच्या नऊ गायी व मालवीय जातीची १ गाय, तसेच २० हजार रुपयांची तीन ते चार महिन्याच्या पाच वासरूपैकी दोन वासरू मृतस्थितीत आढळून आले. याबाबत रावेर पोलिसांनी सुमारे सहा लाख रुपयांचा ट्रक जप्त केला आहे. याबाबत पोलिस कर्मचारी उमेश नरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात प्रमोदकुमार छोटेलाल क्लीनर (रा. फिरोजाबाद, उत्तरप्रदेश), गुडखान मुन्नीलाल खान (रा. नजलामितील ताजलेसर, जि. ऐटा, उत्तर प्रदेश) व अखिलेश यादव सौदानसिंह (रा. उदावू, जि. फिरोजापूर उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार महेबूत तडवी तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.