Cotton Crop esakal
जळगाव

Jalgaon News : Market Feeवरून CCIची कापूस खरेदी रखडली! शेतकऱ्यांच्या दिलाश्याला ‘ब्रेक’

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात ‘सीसीआय’ला कापूस खरेदीचा मुहूर्त अद्यापही सापडत नसल्याचे चित्र आहे. मार्केट शुल्क ५५ पैसे असावे, या मुद्यावरून ही खरेदी रखडली आहे. यामुळे अद्यापही कापसाची जिल्ह्यात विक्री सुरू नाही.

जी होते, ती अत्यल्प आहे. बाजारात कपाशीला काही दिवसांपूर्वी साडेआठ ते नऊ हजारांचा दर मिळत होता. आता तोही दर कमी होऊन तो साडेसात ते आठ हजार रुपये झाला आहे. यामुळे शेतकरी कापसाच्या दराबाबत अधिकच संभ्रमित झाले आहेत. (CCI cotton purchase stopped due to Market Fee Jalgaon News)

गेल्या वर्षी कापसाला १० ते १३ हजारांचा दर मिळाला होता. तो यंदाही मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यामुळे शेतकरी बाजारात कापूस विक्रीस आणत नसल्याचे चित्र आहे.
‘सीसीआय’ने या हप्त्यापासून खुल्या बाजारपेठेत उतरून कापूस खरेदीचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्यापही कापूस खरेदीची केंद्रे सुरू केलेली नाहीत.

‘सीसीआय’ने खुल्या बाजारात उतरून कापूस खरेदी करू, असे सांगतानाच आठ हजार ४०० रुपये दर देण्याचेही सांगितले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, आठ दिवसांनंतरही ‘सीसीआय’ने कापूस खरेदी सुरू केलेली नाही.

‘सीसीआय’ कापूस खरेदी करताना जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांनी मार्केट शुल्क एक रुपये पाच पैशांऐवजी केवळ ५५ लावावे, असे पत्र ‘सीसीआय’ने जिल्हा उपनिबंधकांना दिले आहे. त्यावरून जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या प्रशासकांची बैठक बोलावून शुल्क ५५ पैसे करण्यावर चर्चा केली. मात्र, हे शुल्क राज्य शासनाने ठरवून दिले आहे. राज्य शासनाने ते मान्य केले, तर आम्हाला हरकत नाही, असेही प्रशासकांनी सांगितले.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

त्यावरून राज्य शासनाकडे ५५ पैशांबाबत पत्र पाठवू. शासन जो निर्णय घेईल, तो बाजार समित्यांना मान्य असेल, असे जिल्हा उपनिबंधकांनी ‘सीसीआय’ला पत्र पाठवून सांगितले. मात्र, त्यावर आम्ही ५५ पैसेच मार्केट फी घेऊ, असे आम्हाला लिहून द्या, तरच कापूस खरेदी सुरू होईल, असे पत्र ‘सीसीआय’ने जिल्हा उपनिबंधकांना पाठविले आहे. यामुळे जोपर्यंत शासन ५५ पैशांच्या मार्केट शुल्काला होकार देत नाही, तोपर्यंत कापूस खरेदी होणार नसल्याचे चित्र आहे. यामुळे कापूस उत्पादक प्रचंड अडचणीत आले आहेत.

कापसाला दहा ते १३ हजारांची मागणी आपण केली. मात्र, अद्यापही तो दर मिळत नाही. शेतकऱ्यांचा कापूस ८० ते ९० टक्के घरात आला आहे. रब्बी हंगामातील पिकेही तयार होताहेत. मग घरातील कापूस कोठे विकायचा? दराचे काय आदी अनेक प्रश्‍न कापूस उत्पादकांसमोर आहेत. ‘सीसीआय’ने खरेदी केल्यास शेतकऱ्यांचा कापूस विक्रीचा व दराचा प्रश्‍न सुटणार आहे. प्रतीक्षा आहे, ती खरेदी केंद्रे सुरू होण्याची...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT