Assistant Police Inspector Ganesh Buwa while guiding in Indiranagar plot area.  esakal
जळगाव

Ganeshotsav 2023 : कायद्याच्या चौकटीत राहून सण साजरे करा; सलोखा, भाईचारा जपण्याचे पोलिसांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : गुन्हेगारांना, गुन्हेगारी वृत्तीला लगाम लावण्यासाठी पोलिस सक्षम असून, कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा अडावद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा यांनी दिला आहे.

येथील इंदिरानगर प्लॉट भागात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी चोपड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावळे यांची उपस्थिती होती. (Celebrate festival by staying within framework of law appeals police jalgaon news)

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या इंदिरानगर प्लॉट भागात पहिली शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

गणेश बुवा म्हणाले, की महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातून टोळ्या, गँग, भाई हद्दपार केले आहेत. काहींनी पळ काढला आहे. त्यासाठी आगामी गणेशोत्सवात कुठलाही अनुचित प्रकार न घडू देता गणेशोत्सव मोठ्या अभिमानाने, आनंदाने व ऐकोप्याने साजरा करुन आपल्या शहराचा सलोखा, भाईचारा टिकवून ठेवा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा यांनी केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावले यांनीही गणेश मंडळांना लागतील, त्या सवलती देण्याचे आश्वासन देत चौकटीत राहून उत्सव साजरे करण्याचा सल्ला दिला.

याप्रसंगी तंटामुक्त अध्यक्ष साखरलाल महाजन, गोपीचंद कोळी, दिनकर देशमुख, कैलास तायडे, वजाहअली काझी, जहीर शेठ, श्रीकांत दहाड, बाबु शेख, एम. के. शेटे, पीरु शेठ, शेख ताहेर मन्यार, सचिन महाजन, लक्ष्मण पाटील, जुनेद खान, रियाजअली सय्यद, बापू कोळी, नरेंद्र पाटील, शांताराम पवार, मनोहर देशमुख व गावातील व प्लाट भागातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलने शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशन मागचं कारण काय? स्टोरी ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान Video Viral

Latest Marathi News Live Update: सुरत हायड्रोजन रेल्वे साइटवर केंद्रीय मंत्रींची पाहणी

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवा अन् ४० लाखांचा फंड मिळवा, 'ही' स्कीम माहिती आहे का?

लगाच्या १२ वर्षानंतर घेतला घटस्फोट; आता मुलाचा एकट्याने सांभाळ करतेय मराठी अभिनेत्री; , म्हणते- त्याला माझी गरज...

Crime: वृद्ध महिलेचं ३५ वर्षीय मजुरासोबत प्रेमाचं सूत जुळलं; एकत्र राहण्यासाठी भयंकर कृत्य केलं, जे घडलं त्यानं कुटुंब हादरलं

SCROLL FOR NEXT