truck Passing through potholes on Dhule highway. esakal
जळगाव

Jalgaon : माती टाकून बुजविलेले खड्डे पावसानंतर ‘जैसे थे’

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (जि. जळगाव) : चाळीसगाव - धुळे रस्त्यावरील तरवाडे बारीपासून ते चाळीसगाव बायपासपर्यंत अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघात नित्याचेच झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या तुघलकी कारभारामुळे प्रवाशांचा जीव जात आहे. अपघात होत असताना महामार्ग विभाग मूग गिळून बसला असून, खड्डे डांबर टाकून न बुजवता माती टाकून बुजवल्याने ‘जैसे थे’ परिस्थिती झाली आहे.

चाळीसगाव -धुळे महामार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते. या रस्त्यावरील पडलेले खड्ड्यांचा आकार एवढा मोठा झालेला आहे, की गाड्यांचे मशीन देखील खाली टेकले जातात. गिरणा पुलादरम्यान मोठ्या प्रमाणात लहान-मोठे खड्डे पडले आहेत. ज्यामुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. आज जवळपास चार तास वाहतूक ठप्प झाली होती.(Chalisgaon Dhule Road from Tarwade Bari to Chalisgaon Bypass Damaged due to potholes Jalgaon News)

ठेकेदाराला दिल्या दोन नोटीसा

चाळीसगाव-धुळे या रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे, त्या ठेकेदाराला मागील महिन्यातच दोन नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरी देखील खड्डे बुजविले जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने डोळ्यावर बांधलेली पट्टी काढावी व रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे. संबंधित ठेकेदाराला दोन नोटिसा देऊन देखील दुरुस्तीचे काम न केल्याने त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

डिजाईनप्रमाणे काम होणार

मेहुणबारे येथील तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत पट्ट्याचे काम यापूर्वी राज्य महामार्ग विभागाने केले आहे. त्यावरच ही डागडुजी केली जात आहे. त्यामुळे हा रस्ता लगेचच खराब होत आहे. या भागातील रस्ता कामाचे डिझाईन तयार करण्यात आले असून, त्याप्रमाणे त्या भागातील कामे होणार असल्याची माहिती राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने दिली.

कामाचे सोयरसुतक नाही

मेहुणबारे ते चाळीसगाव रस्त्याच्या कामाचे राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना काहीच सोयरसुतक नाही. चार दिवसांपूर्वी या रस्त्यावरील खड्डयांनी निष्पाप बालिकेचा बळी घेतला. या संदर्भात राष्ट्रीय प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक अजय यादव यांना विचारले असता मुंबईला बैठक असल्याचे सांगून वेळ मारून नेली. त्यामुळे या रस्त्याला कुणी वाली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax law : १ एप्रिल २०२६ पासून मोदी सरकार तुमच्या फोनमधील मेसेज चेक करणार? नव्या Income Tax कायद्यामागचं सत्य काय?

Latest Marathi News Live Update : वाहन चालकाला डुलकी लागल्याने समृद्धी महामार्गावर अपघात, महिला जखमी

Leopard: शिकार केलेल्या ठिकाणी बिबट्या पुन्हा-पुन्हा का येतो? माणसाने कोणती काळजी घेतली पाहिजे?

Shashikant Shinde : पक्षाचे हित महत्त्वाचे; सन्मानजनक प्रस्तावासह दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर निर्णय होईल- शशिकांत शिंदे!

Pune Police Rescue : बाणेरमधील लॉजवर पोलिसांची धडक; महिलांची सुटका; व्यवस्थापकासह चार आरोपी अटकेत!

SCROLL FOR NEXT