MLA Mangesh Chavan while addressing the protest march at Chhatrapati Shivaji Maharaj Chowk. esakal
जळगाव

Jalgaon News : आक्रोश मोर्चाने चाळीसगाव दणाणले! शुभम आगोणेच्या मारेकऱ्यांना फाशीची मागणी

या हत्या प्रकरणातील फरारी संशयितांचा तातडीने शोध घेऊन त्यांना फाशी द्यावी, अशी मागणी संतप्त मोर्चेकऱ्यांनी केली.

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : येथील रहिवासी तथा मुंबई पोलिस दलातील कर्मचारी शुभम आगोणे यांच्या हत्या प्रकरणातील दोषींना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सोमवारी (ता. २२) काढण्यात आलेल्या मोर्चाने शहर दणाणले होते.

मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या हत्या प्रकरणातील फरारी संशयितांचा तातडीने शोध घेऊन त्यांना फाशी द्यावी, अशी मागणी संतप्त मोर्चेकऱ्यांनी केली. (Chalisgaon rocked by protest march Demand death for Shubham Agone killers Jalgaon News)

शुभम आगोणे याची रविवारी (ता. १४) पाटणादेवी रोडवरील बामोशी बाबांच्या दर्ग्यासमोर क्रिकेटच्या वादातून येथील सराईत गुन्हेगारांनी तलवारी व चॉपरने वार करून हत्या केली होती.

या गुन्ह्यातील काही संशयित अजूनही फरारी असल्याने त्यांना त्वरित अटक करावी, सर्व आरोपींना फाशी द्यावी या मागणीसाठी सोमवारी सकाळी दहाला पाटणादेवी रोड परिसरातील अहिल्यादेवी पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली.

‘शुभमच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. या बाजारमार्गे पोलिस ठाण्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चा आल्यानंतर सर्वांनी ठिय्या मांडला.

माजी मंत्री बाळासाहेब दोडकुते यांनी याप्रकरणी न्याय न मिळाल्यास, जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा दिला.

सहा महिन्यांत निकाल लावा

धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष नवनाथ ढगे यांनी शुभमच्या मारेकऱ्यांना फाशीऐवजी शुभमला ज्या ठिकाणी मारले, त्याच ठिकाणी त्यांना गोळ्या घाला, असे सांगून हा खटला ‘अंडर ट्रायल’ चालवून सहा महिन्यांत निकाल लावून शुभमच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी केली.

अमळनेर येथील अहिल्या वाहिनीचे तालुकाध्यक्ष चेतन देवरे यांनीही या गुन्ह्यातील आरोपींना कोणी राजकीय पाठबळ देत असेल, तर त्यांना धनगर समाज सोडणार नाही, असा इशारा दिला.

माजी आमदार राजीव देशमुख यांनी शांततेला गालबोट लावणाऱ्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे, असे सांगून अवैध धंदेवाल्यांना आळा घालावा म्हणजे अशी गुन्हेगारी वृत्ती वाढणार नाही, असे सांगितले.

खासदार उन्मेष पाटील यांनी या गुन्ह्यातील आरोपींना लावण्यात आलेला ‘मोक्का’ कोणी रद्द करून आणला, याची चौकशी झालीच पाहिजे, असे सांगून शुभमच्या मारेकऱ्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी केली.

गणेश जाने यांनी सूत्रसंचालन केले. तहसीलदार प्रशांत पाटील व पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले.

मृत शुभमच्या आत्या, बहिणीसह पत्नीने संतप्त भावना व्यक्त करून शुभमच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी केली. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनीही या गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली.

‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात खटला चालवू

शुभमच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, यासाठी हा खटला ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालविण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

ते म्हणाले, की शुभम आपल्याला मुंबईतही भेटायचा. रायगडला माझ्यासोबत तो तीन दिवस सर्व मित्रांना घेऊन थांबला होता. त्याचे जाणे ही अत्यंत दुःखद घटना आहे. शुभमची ज्या प्रकारे हत्या झाली, ते पाहता गुन्हेगारी प्रवृत्ती हद्दपार करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

उर्वरित संशयितांना दहा दिवसांच्या आत पोलिस प्रशासनाला अटक करण्याच्या संदर्भात आपण दबाव आणू. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाज बांधवांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची वेळ दिलेली असल्याने त्यांना आपण भेटणार आहोत.

मी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष देणार आहे. अशा समाजविघातक प्रवृत्तीला कुठल्याही प्रकारचा थारा मिळणार नाही, असे सांगून शुभमला न्याय मिळेपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT