जळगाव

भारत-बांगलादेशच्या 'या' करारात चाळीसगावच्या शिक्षकाचा सिंहाचा वाटा

भारत-बांगलादेशमधील टेलिकम्युनिकेशन कराराचे चाळीसगाव कनेक्शन

दीपक कच्छवा :सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील आश्रम शाळेचे शिक्षक सुनील मोरे यांनी दिले. यांचा नुसता चाळीसगाव तालुक्याला नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला अभिमान वाटतो आहे.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव- जळगाव) : भारताने जागतिकीकरण स्वीकारले आणि भारतातील बुद्धीचा जगाला देखील उपयोग होऊ लागला. अनेक देशांचे विविध पातळीवर करार होऊ लागले. त्यातच भारत आणि बांगलादेशाचे टेलिकम्युनिकेशन संदर्भातील करार झाले. यात महत्त्वाचे योगदान मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील आश्रम शाळेचे शिक्षक सुनील मोरे यांनी दिले. यांचा नुसता चाळीसगाव तालुक्याला नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला अभिमान वाटतो आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नाते कसे आहे. राजकीय पटलावर काय चर्चा करतात? यापेक्षा आपल्या बुद्धीचा वापर करून या दोन्ही देशाचे कम्युनिकेशन चांगले करता येऊ शकते का? या तांत्रिक कामासाठी मोरे यांनी स्वतःच्या बुद्धीचा कस लावला असल्याचे हे येथे महत्त्वाचे ठरते. (chalisgaon teacher sunil more contributed to the agreement on telecommunications between India and Bangladesh)

स्वीडन येथील इको ट्रेनिंग सेंटर, नाशिकच्या विद्या प्राधिकरण, बांगलादेशाच्या इलमेंट्री एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमानाने भारत बांगलादेश टेली कोलेबोरेशन प्रकल्प २०२१ हा नुकताच राबविण्यात आला. या प्रकल्पात आनुदानित आदिवासी माध्यमिक विद्यालय मेहुणबारे येथील उपक्रमशील शिक्षक सुनिल मोरे यांनी ऑनलाईन सहभाग घेऊन त्यांच्या सोबत बांगला देशातील शिक्षक मिजनुर रहेमान व पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन माहिती जाणून घेतली.

व्हिडीओच्या साहाय्याने प्रझेटेशंन

भारत व बांगलादेशातील सहभागी शिक्षकांनी आपापल्या देशातील सांस्कृतिक, औद्योगिक, ऐतिहासक व शैक्षणिक माहितीचे पाँवरपाँईंट प्रझेटेशंन फोटो, व्हिडीओच्या साहाय्याने अदान प्रदान केले. युनायटेड नेशन्स आँर्गनायझेशन (युनो) ठरवून दिलेल्या १७ शाश्वत विकासाच्या ध्येय बाबतीत जागरूकता निर्माण व्हावी हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

शुध्द पाण्याची उपलब्धतेवर चर्चा

या प्रकल्पाच्या माध्यमातून ठरवून दिलेल्या १७ ध्येयांपैकी भुक निर्मूलन, दारिद्र निर्मूलन, चांगले आरोग्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शुध्द पाण्याची उपलब्धता,आणि सांडपाण्याची व्यवस्था, असमनता कमी करणे या विविध महत्त्वाच्या मुद्यांवर १६ सत्रामध्ये ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले व प्रकल्प पुर्ण करण्यात आला. या प्रकल्पात राष्ट्रीय समन्वयक नाशिक डायटचे प्रा. योगेश सोनवणे, वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक प्रा.भरत शिरसाट, यांचे मार्गदर्शन लाभले. प्रकल्प यशस्वी झाल्याबद्दल श्री. मोरे यांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, सचिव विजय चौधरी यांनी कौतुक केले तर मुख्याध्यापक मुकेश चौधरी व वैभव चौधरी यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT