Jalgaon news sakal
जळगाव

जळगाव : शेळ्या चोरीच्या संशयावरून पाठलाग; भरधाव कार गटारात

सावद्यातील घटना; दोघे फरारी

सकाळ वृत्तसेवा

सावदा : येथील आठवडे बाजार परिसरातून शेळ्या चोरून पलायन करणाऱ्या कारचा पाठलाग करताना अपघात होऊन कार थेट गटार पार करून पातळगंगा नदीपात्रात जाऊन थांबली. या वाहनात चालकासह एक जण होता. परंतु घटना घडताच ते पळून गेले. कारमध्ये (एमएच ०२, एवाय ५१२९) या वाहनात शेळ्या चोरून नेत असल्याचे निदर्शनात आल्याने दुचाकीस्वाराने या कारचा आठवडे बाजार परिसरात पाठलाग केला. या वेळी कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार गटार ओलांडून पाताळगंगा नदीपात्रात जाऊन थांबली. या कारचे मागील चाक पंम्चर झाले तर कारच्या समोरील बाजूचे नुकसान झाले. याच वेळी वाहनाचा पाठलाग करणारा दुचाकीस्वारही गटारात वाहनासह पडला. त्याला सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही.

या वाहनात प्लास्टिक पिशवीत मका बियाणे आणि वनस्पतीची पाने होती. त्यातील व्यक्ती शेळ्या ज्या ठिकाणी उभ्या असतात, त्या ठिकाणी कार थांबवून शेळ्यांना खाण्याचे आमिष दाखवून त्या जवळ आल्या की त्यांना गुपचूप वाहनात ओढून घेत होते, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, ते पळण्याच्या तयारीत असताना हा अपघात घडला.

ही कार ज्यावेळी थांबली, त्यावेळी वाहनाचा दरवाजा उघडताच त्यातील दोन ते तीन शेळ्या बाहेर उड्या मारून मोकाट सुटल्या. संबंधित कार वाशी (नवी मुंबई) येथील आरटीओकडे आणि एका महिलेच्या नावावर रजिस्टर असल्याचे दिसत आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. डी. इंगोले यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस देवा पाटील, उमेश पाटील आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून माहिती घेतली. या प्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

एका रिलवर विश्वास ठेवला अन् १५ वर्षांनी आई झाली मराठी अभिनेत्री; व्हिडिओ शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT