Child esakal
जळगाव

आईवडिल नसलेल्या 700 बालकांना बालसंगोपना योजना ठरतेय जीवनामृत

कोरोना महामारीने आतापर्यंत ८५७ बालकांचे आई-वडील हिरावून घेतले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : समाजात अशी अनेक बालके आहेत, ज्यांना स्वतःचे आई-वडील नाहीत. काहींच्या आई-वडीलांचे बळी नुकत्याच कोरोना महामारीने घेतले आहेत. इतरही अशी बालके आहेत, त्यांचे संगापन पालक स्वतः करू शकत नाही, अशा सुमारे जिल्ह्यातील सातशे बालकांना दरमहा अकराशे रुपयांची मदत शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे दिली जाते. या बालकांना ही मदत जीवनामृत ठरत असल्याचे चित्र आहे. (Latest Marathi News)

कोरोना महामारीने आतापर्यंत ८५७ बालकांचे आई-वडील हिरावून घेतले आहेत. त्यापैकी २० बालकांचे दोन्ही (आई-वडील) हिरावले आहेत. अशांना राज्य शासनाकडून प्रत्येकी पाच लाखांची, तर केंद्र शासनाकडून दहा लाखांच्या मदत करण्यात आली आहे. या बालकांकडे प्रत्येकी पंधरा लाखांच्या एफडी आहेत. या बालकांनी वयाची अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांना त्या रकमेचा विनियोग शिक्षण, व्यवसायासाठी करता येणार आहे. यामुळे ही बालके स्वतःच्या पायावर उभी राहून जीवनाचा चारितार्थ चालवू शकतील. सोबतच या मुलांना महिनाभरासाठी जीवनाश्‍यक खर्च म्हणून बालसंगोपन योजनेतून अकराशेची मदत मिळत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ८५७ पैकी ५२२ बालकांना दहा हजार रुपये शैक्षणिक खर्च म्हणून निधी दिला आहे. तो जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने संबंधित बालकांना उपलब्ध करून दिला आहे.

भिक मागणाऱ्यांचे पालकत्व करतेय शासन

याव्यतिरक्त ज्या बालकांचे पालकत्व पालक सांभाळू शकत नाही, त्यांच्यावर अत्याचार करून बालकामगार म्हणून कामाला पाठवितात, त्यांना भिक मागण्यासाठी प्रवृत्त करतात, अशा ३९६ बालकांनाही बालसंयोगन योजनेंतर्गत अकराशे रुपयांची दरमहा मदत दिले जाते. त्यांना शाळेत पाठवून शिक्षित केले जात आहे. जेणेकरून ते भविष्यात चांगले नागरिक बनतील. समाजात प्रतिष्ठा मिळवतील. या योजनेमुळे गेल्या सहा महिन्यांत शहरासह जिल्ह्यात बाल भिकारी मुले दिसत नाही. या मुलांना महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना वरील योजनेचा लाभ दिला. सोबतच त्यांना निवाऱ्याची सोयही करून दिली आहे. ‘तुमचा बालक भिक मागताना दिसला, तर तुमच्यावर कारवाई करू’, अशी तंबी त्यांच्या पालकानाही दिली आहे.

''पालक नसलेल्या किंवा पालक म्हणून जबाबदारी सांभाळू शकत नसलेल्या बालकांना बालसंयोपन योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी पालकांनी मध्यस्थ, दलालाशी संपर्क न साधता बालकल्याण विभागाशी संपर्क साधावा.'' - योगेश मुक्कावार, जिल्हा बालसरंक्षण अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT