Late Vikrant mishra  esakal
जळगाव

Jalgaon : मेहरुण ट्रॅकवर सुसाट कारने बालकास चिरडले

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी वाहतुकीसाठी सुरक्षीत समजला जाणारा मेहरुण ट्रॅकचा सायकलिंगचा आनंद घेणाऱ्या एका अकरा वर्षीच बालकाला सुसाट कारने चिरडल्याची घटना रविवारी (ता. २८) घडली.

विक्रांत संतोष मिश्रा असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. कारची गती इतकी भीषण होती, की या अपघातात विक्रांत हा सायकलसह फुटबॉलसारखा हवेत झेपावला. या भीषण अपघातात विक्रांतचा जागीच मृत्यू झाला. (Child crushed by speeding innova car on Mehrun track Jalgaon Latest Marathi News)

शहरातील एकनाथनगर येथे विक्रांत संतोष मिश्रा (वय ११) हा आई-वडीलांसह वास्तव्यास आहे. तो विद्या इंग्लिश मीडियम शाळेत चौथीचे शिक्षण घेत होता. रविवारी सुटीचा दिवस असल्याने विक्रांत व त्याचा चुलत भाऊ सुनील जितेंद्र मिश्रा हे दोघे सोबत सायकलिंगसाठी मेहरुण ट्रॅकवर आले होते.

मेहरुण ट्रॅकच्या कमी वर्दळ असलेल्या रस्त्यावर चुलत भावासह सायकलिंग करत असताना ट्रॅकवर सुसाट वेगात येणाऱ्या दोन कारपैकी पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारच्या (एमएच १९ बीयु ६००६) चालकाने विक्रांतच्या सायकलला जोरदार धडक दिली. अपघातात विक्रांत सायकलसह फुटबॉलसारखा हवेत उडाला व खाली डोक्यावर कोसळला.

तर, त्याची सायकल रस्त्याच्या कडेला फेकली गेली. अपघातानंतर परिसरातील तरुणांनी धाव घेत जखमीला जिल्हा रुग्णालयात हलवले. एमआयडीसी पोलिसांना घटना कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत विक्रांतला रुग्णालयात आणण्यात आले. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्दा यांच्यासह डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यावर मृत घोषित केले.

कुटुंबीयांचा आक्रोश

अपघाताची माहिती कळताच विक्रांतच्या कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांनी रुग्णालयात धाव घेतली. विक्रांतचा मृत्यू झाल्याचे कळताच आई-वडील काकांसह कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. थोड्या वेळातच जिल्‍हा रुग्णालयात प्रचंड गर्दी उसळली. पोलिस चौकीत पब्लिक तडी...

रुग्णालयात जमाव एकवटला असताना विक्रांत मिश्रा या तरुणाला कारने चिरडणाऱ्या दोघांनाही रुग्णालयात आणण्यात आले होते. घटनास्थळावर हजर असलेल्या काही तरुणांनी त्यांना ओळखताच लोकांचा संताप अनावर झाला. दोघांना जिल्हा रुग्णालयातील चौकीतच बदडून काढले. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत दोघाना सुखरूप गर्दीतून काढून पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी गाडी चालवणाऱ्यासह तिघांना ताब्यात घेतले असून तिघेही अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचे असताना सुसाट कार रेसिंग करत होते. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

मृत्यूच्या वेगाचा ट्रॅक...

मेहरुण तलावाकाठी पहाटे ५ वाजेपासून ज्येष्ठ नागरिकांची मॉर्निंग वॉकसाठी गर्दी होते. दिवस उजाडल्यापासून त्यांना क्लासेस-शिकवण्या बंक (बुडवून) करून सुसाट वेगात दुचाकी पळवणाऱ्या तरुणांचा त्रास असतो, तर दुपारी ‘लवबर्ड’ उच्छाद घालतात. दररोज अंधार पडण्यापूर्वी आणि शनिवार-रविवार सुटीच्या दिवशी हुल्लडबाज चारचाकी कार घेऊन ट्रॅकवर उतरतात. याच कार रेसिंगमुळे विक्रांत मिश्रा या निष्पाप बालकाचा जीव घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT