Parents reached Thane  esakal
जळगाव

Child Trafficking : ‘त्या’ 36 मुलांचे पालक कागदपत्रांसह भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात हजर

सकाळ वृत्तसेवा

Child Trafficking : बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यातून दोन पथके बिहार व सांगलीच्या दिशेने शुक्रवारी (ता.२) रवाना झाली.

या तपासात मदरसा आहे का? त्याचे रजिस्ट्रेशन आहे का? यासह विविध मुद्द्यांबाबत पथक सखोल चौकशी करणार आहे. (child trafficking Parents of 36 children present at Bhusawal Railway Police Station with documents jalgaon crime news)

तपासासाठी वेळ कमी असल्याने शीघ्रगतीने तपास करण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेपुढे आहे. या तपास पथकात पोलिस निरीक्षक विजय घेरडे व ठाणे अंमलदार सचिन दैवे यांचा समावेश आहे. दरम्यान, ५९ मुलांपैकी ३६ मुलांचे पालक कागदपत्रांसह येथील रेल्वे पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.

जळगाव येथील बालसुधारगृहातील २९ मुलांना ठेवण्यात आले असून, त्यापैकी २० मुलांचे पालक (आई, वडील) कागदपत्रे घेऊन गयारी (ता. अररिया, बिहार) येथून भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात पोहोचले आहेत.

निरीक्षक विजय घेरडे हे तपासकामी असल्याने शुक्रवारी (ता.२) मनमाड पोलिस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा नूतन पदभार सांभाळणारे मारुती पंडित यांच्याशी संपर्क साधून त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उर्वरित ३० मुलांना नाशिकच्या बालसुधारगृहात दाखल केले आले. त्यापैकी १६ मुलांचे पालक (आई, वडील) छत्तीस तासांचा प्रवासानंतर भुसावळमध्ये दाखल झाले.

त्यानंतर शनिवारी (ता.३) सकाळी १६ पालक मनमाड लोहमार्ग पोलिस ठाण्यात जाऊन आपला जबाब नोंदविणार आहे. दरम्यान, मुस्लिम मंचतर्फे त्यांची जेवणाची व रात्रभर झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT