cold and cough Esakal
जळगाव

Cold-Cough: बालकांचा सर्दी-खोकला लवकर बरा होईना; पालकांना टेन्शन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : एकदा सर्दी-खोकला झाला, की तो परत काही दिवसांनी परतून येण्याचे प्रमाण शहरासह जिल्ह्यात वाढले आहे. कोणत्याही औषधी घ्या, इंजेक्शन घ्या किंवा इन्हेलर वापरा. त्याचा काही काळापुरता परिणाम होतो. वातावरणात बदल होताच पुन्हा मुलांना सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाल्याचे चित्र आहे.

सर्वाधिक त्रास विशेषतः लहान मुले आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांना होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. कोरोना काळात सर्दी-खोकला म्हटले, की ‘कोरोना’, असे समीकरण तयार झाले होते. तिसऱ्या लाटेत अनेकांना सर्दी व खोकल्याचा त्रास झाला. नंतर मात्र कोरोना गेल्याचे चित्र आहे.

असे असले तरी जिल्ह्यातील वातावरण कधी एकदम थंड, गार वारे किंवा सकाळी, रात्री थंड, दिवसा गरम, असे होत आहे. कोरोनाचे वेगवेगळे विषाणू आणि उपप्रकाराच्या संसर्गाबरोबरच इतर वेगवेगळ्या विषाणूजन्य आजारांमुळे सध्या सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढल्याचे डॉक्टर सांगतात.

ही आहेत प्रमुख कारणे

*वातावरणातील बदल हिवाळ्यात प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढतात. यंदा त्यात बांधकामे आणि रस्त्याच्या कडेला जाळला जाणाऱ्या कचऱ्याची मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. हिवाळ्यात हवेच्या अभिसरणाचा वेग कमी असतो. त्यामुळे हवेतील प्रदूषक घटक जमिनीलगत राहतात. त्याचाही परिणाम आरोग्यावर होतो.

*सध्या एकापोठापाठ एक विषाणूंचा संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळे एका विषाणूच्या संसर्गातून झालेला सर्दी-खोकला बरा झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्येच दुसऱ्या विषाणूंचा संसर्ग होतो. त्यामुळे सर्दी-खोकला असल्याचे जाणवते

हेही वाचा: अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

*कोरोनानंतर आता शाळा पुन्हा सुरू झाल्याने रिक्षा, व्हॅनमधून एकत्र प्रवास होतो. शाळेत मुले मास्क, सोशल डिस्टन्स आणि हँड सॅनिटाझर याचा पुरेसा वापर करत नाहीत. त्यामुळे एकाकडून दुसऱ्याकडे विषाणुजन्य आजारांचे संक्रमण सारखे होते.

*पौष्टिक आणि चौरस आहाराचा अभाव असल्याने मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे.

''बालकांना सर्दी, खोकलयाचा त्रास होत असला, तरी योग्य उपचारानंतर त्रास कमी होतो. वारंवार त्रास होत असेल, तज्ज्ञ डाकटरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत. मुलांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आणि चौरस आहार मुलांना पालकांनी द्यावा.'' -डॉ. गिरीश राणे, सहाय्यक प्राध्यापक, ‘जीएमसी’, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT