crime news  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : ग्रामपंचायत सदस्यावरील चॉपर हल्ला; फरारी दोघांचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शिरसोली ग्रामपंचायत सदस्य नितीन अर्जुन बुंधे (वय ३४) यांच्यावर चॉपरहल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. (Chopper attack on Gram Panchayat member jalgaon news)

शिरसोली येथील जळगाव रोडवरील हॉटेल प्रशांत येथे शनिवारी (ता. २२) घटना घडल्यानंतरही एमआयडीसी पोलिसांनी दुसरा दिवस उलटून रात्री उशिरा या प्रकरणी जखमीचा जबाब नोंदवून मारहाण-शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २३) रात्री नऊला गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन जणांना अटक करण्यात आली. अजय विजू भिल आणि किरण कोळी (दोन्ही रा. शिरसोली, ता. जि. जळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शिरसोली-जळगाव रस्त्यावरील प्रशांत हॉटेलमध्ये शनिवारी रात्री दहाला जेवणाचे बिल देण्यावरून हॉटेलमालकासोबत अजय विजय भिल, किरण कोळी भांडण करत होते. ग्रामपंचायत सदस्य नितीन बुंधे यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली असता, त्यांच्यावर अजय भिल आणि किरण कोळी यांनी फोन करून दोघांना बोलावून घेत चौघांनी हॉटेलमालकासह नितीन बुंधे यांना मारहाण केली. एकाने चॉपरने नितीन बुंधे यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले.

नितीन बुंधे यांच्यावर तीन-चार वार केल्यानंतर हॉटेलमध्ये एकच धावपळ उडून ग्रामस्थांनी मदतीला धाव घेतली. बुंधे यांना जिल्‍हा रुग्णालयात व तेथून खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. जखमीचा जबाब नोंदवून घेतल्यावर मारहाण व शिवीगाळ केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. सोशल मीडियासह वृत्तपत्रांमध्ये बातम्या झळकल्यावर दोघा संशयितांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. सहाय्यक फौजदार जितेंद्र राठोड तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मृतीच्या वडिलांनंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली, रुग्णालयात घेतले उपचार

सांगलीत ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार! राँग साइडने चालवली स्कोडा, ६-७ वाहनांना धडक; अनेकजण जखमी

दुर्दैवी घटना! 'शेतीत मशागत करताना रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू'; कागल तालुक्यातील घटना, अचानक तोल गेला अन्..

CM Eknath Shinde: आमचा शत्रू फक्त महाविकास आघाडीच: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; स्थानिकमध्ये एकमेकांविरुद्ध लढलो म्हणजे शत्रू नाही

Crime News : पुण्यात घरफोडी करणारी तरुणींची टोळी, विदर्भातून सहा जणींना घेतलं ताब्यात; VIDEO झालेला व्हायरल

SCROLL FOR NEXT