crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : सिंधी कॉलनीतील दुकानदारावर चॉपर हल्ला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील मोबाईल दुकानदाराला दोन तरुणांनी चॉपरने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली.

जिल्हापेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी हल्लेखोर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Chopper attack on shopkeeper in Sindhi Colony jalgaon crime news)

शहरातील सिंधी कॉलनी परिसरात सुमीत वसंतलाल वलबानी (वय ३१) तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मोबाईल दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवार (ता.१४) रोजी रात्री साडेबारा वाजता सुमीत वलबानी हा त्याच्या घरासमोर उभा होता.

रात्रीच्या वेळेस कॉलनीत दोन जण फिरत होते. त्यावेळी विनाकारण काय फिरता असे सुमितने विचारले. याचा राग आल्याने संशयित आरोपी आर्यन पवार (रा. शनिपेठ) व त्याचा साथीदार नामिर खान अशा दोघांनी चॉपरने वार करून सुमितला जखमी केले.

हा प्रकार घडल्यानंतर सुमितला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान सुमीत वलबानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

Mumbai News: एकुलती एक मुलगी, १६ वर्षे कोमात, ३७ लाख भरपाई देण्याचे आदेश; वेदनांची भरपाई पैशात होणार नाही !

Adani समूह आता स्मार्ट मीटर कंपनी विकत घेण्याच्या तयारीत; 1500 कोटींची डील होण्याची शक्यता...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune News: दूषित पाण्यामुळे आरोग्याशी खेळ! कात्रजमध्ये पाणीपुरवठा विभागाचा गोंधळ; जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीटंचाई आणि दूषित पाणी

SCROLL FOR NEXT