जळगाव : कासमवाडी-सम्राट कॉलनीत दोघांवर चॉपरने हल्ला sakal
जळगाव

जळगाव : कासमवाडी-सम्राट कॉलनीत दोघांवर चॉपरने हल्ला

दीड तासात दोन घटनांमध्ये मारहाणीचा प्रकार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील जुना मेहरुण रोडवरील कासमवाडी आणि सम्राट कॉलनी परिसरात अवघ्या दीड तासात दोघांवर चॉपरने हल्ला चढवून मारहाण झाल्याच्या घटना घडल्या. जखमींच्या तक्रारीवरून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या घटनेत दीक्षितवाडी जुने पावर हाउस येथील रहिवासी तरुण निखिल गायकवाड (वय २१) हे शुक्रवारी (ता. १५) रात्री अकराच्या सुमारास जात असताना त्यांना उदय राठोड याचा धक्का लागला. कशासाठी धक्का मारला, याचा जाब विचारण्यावरून वाद होऊन उदय राठोड याने चॉपर काढून निखिल गायकवाड याच्या कंबरेत खुपसून दुखापत केली. जबाबावरून उदय राठोड व त्याचा साथीदार अवी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत जुनी रचना कॉलनी येथील रहिवासी विद्यार्थी प्रशांत चौधरी (वय २१) याच्याशी मागील वादातून सुनील राठोड याने फोन करून प्रशांतला बोलावून घेत सुरवातीला चॉपर लावून धमकावण्यात आले. नंतर सुनीलने चॉपरने वार करून दुखापत केली. त्यानंतर अनिल राठोडने डोक्यात दगड टाकून जखमी केले. तर रोहित भालेराव याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केल्यावर पोलिसांनी जबाब नोंदवल्यानुसार सुनील राठोड, अनिल राठोड, अमनस चंद्रकांत सोनवणे, रोहित भालेराव अशांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dry Day: तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरात ३ दिवस ड्राय डे; कोणकोणत्या शहरात मद्यविक्री बंद? जाणून घ्या यादी...

Ishan Kishan ने इतिहास रचला! अ‍ॅडम गिलख्रिस्टचा मोठा विक्रम मोडला, ठरला जगातील पहिला खेळाडू ज्याने...

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये मतदार याद्यांवर नागरिकांच्या हरकती

Education News : बोगस विद्यार्थी, बोगस अनुदान! शालेय शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर, १५ वर्षांनंतर पुन्हा पटपडताळणी

सुरज चव्हाणची लग्नानंतरची गुळणा-गुळणी बघितली का? व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT