A magnificent statue of Shri Dutt Maharaj.
A magnificent statue of Shri Dutt Maharaj. esakal
जळगाव

Datta Maharaj Yatra : चोरवडला दत्त महाराजांची आजपासून यात्रा; 400 वर्षांची परंपरा

संजय पाटील

Datta Maharaj Yatra : चोरवड (ता. पारोळा) येथील दत्ताचे जागृत देवस्थान यात्रेस आजपासून सुरवात होत आहे.

मार्गशीर्ष महिन्यात होणाऱ्या या यात्रेस चारशे वर्षांची परंपरा आहे.(Chorvad datta Maharaj yatra from today jalgaon news)

पारोळ्यापासून १३ किलोमीटर अंतरावर चोरवड गाव असून, गावाच्या पश्चिम दिशेला श्री दत्त महाराजांची पुरातन लहान, मोठी अशी दोन मंदिरे आहेत. दोन्ही मंदिरात इ. स. १६०२ मध्ये दत्ताची मूर्ती स्थापन केल्याचा इतिहास आहे.

महानुभाव पंथाचे एकमुखी दत्ताचे हे खानदेशात एकमेव स्थान असून, दहा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी लाखो भाविक पूर्ण राज्यातून येथे मुक्कामी येत असतात. या यात्रेसाठी पारोळा बस आगाराकडून अनेक विशेष बसेस सोडल्या जातात.

त्या मुळे भक्तांची प्रचंड गर्दी यात्रेत दिसून येते. असे असले तरी चोरवडलगत असलेली भोंडण, पोपटनगर, मंगरूळ, वलवाडी आदी परिसरातील नागरिक आजही बैलगाडीवर सहकुटुंब येणे पसंत करतात.

खाद्यपदार्थांची रेलचेल

आठ दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी झुले पाळणे, करमणुकीसाठी विविध स्टॉल, खाद्य पदार्थांच्या गाड्या सजल्या आहेत. यात्रेसाठी सरपंच राकेश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांचे सहकार्य लाभत असते.

भाविकांना आवाहन

भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी ग्रामपंचायतीकडून योग्य ती खबरदारी घेतली गेली असून, भाविकांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन सरपंच राकेश पाटील यांनी केले असून, यात्रा उत्साहात भाविकांनी अंगावरील सोने, दागिने सांभाळून यात्रोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलं हवीत की ‘रील स्टार’?

मानवी अस्तित्वाचा वास्तव शोध!

महिला धोरणांचा प्रवास

अनुभवात्मक शिक्षण हवेच!

प्लास्टिक प्रदूषणमुक्ती... एक जागतिक दिवास्वप्न!

SCROLL FOR NEXT