Jamner: Minister Girish Mahajan welcoming Jitesh Patil with a bouquet. Neighbors Taluka President Chandrakant Baviskar, Jitu Patil etc. esakal
जळगाव

Jalgaon Political Update : जामनेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भाजपात दाखल !

सकाळ वृत्तसेवा

जामनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेश ऊर्फ पप्पू पाटील यांनी नुकताच राज्याचे ग्रामविकास तथा क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. या वेळी पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

राष्ट्रवादीला पंधरा दिवसांतच पुन्हा एक धक्का बसला आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते व माजी पंचायत समिती सदस्य रामलाल नाईक यांनीही आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मंत्री महाजनांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला होता.(City mayor of Jamner NCP Joined BJP

Jalgaon Political News)

जितेश पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. विरोधक म्हणून अनेक आंदोलनात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सहभाग घेतला असून, पक्षाच्या विविध कार्यक्रमात ते हिरिरीने सामील होत होते.

येत्या पाच-सहा महिन्यावर जामनेर नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली असून, पप्पू पाटील यांच्या प्रवेशाने भाजपला काहीअंशी का होईना, राजकीय बळ मिळणार असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT