Officials inspecting the tanks as part of measures implemented by Zilla Parishad Health Department to control dengue in rural areas. esakal
जळगाव

Dengue Disease: जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेंगी नियंत्रणात; आरोग्य यंत्रणेचा दावा

सकाळ वृत्तसेवा

Dengue Disease : जिल्ह्यातील ग्रामीण भागात किटकजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या जात असून जिल्ह्यात डेंगी नियंत्रणात आल्याचा दावा जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात १५ पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले असून आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात वर्षभरात ५५ डेंगी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. (Claim of health system in controlling dengue in rural areas of district jalgaon news)

जळगाव जिल्ह्यात कीटकजन्य आजाराच्या निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ॲक्शन मोडवर उपाययोजना राबविल्या जात आहेत. आरोग्य विभाग पथकांच्या माध्यामातून घरोघरी जावून पाहणी करीत आहे.

या उपाययोजनांवर भर

डेंगी नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फे नियमित फवारणी करण्यासह आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यासह विविध उपाययोजना मोठ्या प्रमाणावर राबवल्या जात आहेत.

असे आढळले रुग्ण

जिल्ह्यातील ग्रामीण भागात जानेवारीत शून्य, फेब्रुवारीमध्ये एक, मार्च आणि एप्रिलमध्ये शून्य, मे मध्ये सहा, जूनमध्ये पाच, जुलैत सहा, ऑगस्टमध्ये चार, सप्टेंबरमध्ये १९, तर ऑक्टोबरमध्ये १५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

आतापर्यंत ७०३ डेंगीसदृश रुग्ण तर ५५ रुग्ण वर्षभरात पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यातील डेंगीची साथ संपूर्णपणे आटोक्यात असून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत या आजारावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत.

"जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांच्या आरोग्य यंत्रणेमार्फत गावागावात खेड्यापाड्यावर डेंगीला आळा घालण्याच्या दृष्टीने जनजागृती मोहीम देखील मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात डेंगी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे." - डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat News: ताम्हिणी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी! पुणे-कोकण मार्ग बंद करण्याचा निर्णय, वाहनांच्या लांबच लांब रांगा

IND vs SA, 2nd Test: शुभमन गिल खेळला नाही, तर रिषभ पंतच्या नावावर होणार मोठा विक्रम! धोनीनंतर पहिल्यांदाच...

Solapur Election : अर्ज छाननीत पाच तासांचा थरार; कोंडूभैरी आणि कदम यांच्या भूमिकेवर नगराध्यक्ष निवडीचे समीकरण अवलंबून!

Kolhapur News: महायुतीतील मित्रपक्षांत धुसफूस, ‘इनकमिंग’वरून नाराजी; जागा वाटप फॉर्म्युला अनिश्चित

Umarga News : महायुती व महाविकास आघाडीचे आज चित्र स्पष्ट होणार; उमरगा व मुरुम पालिकेतील तडजोडीकडे सर्वांचे लक्ष!

SCROLL FOR NEXT