Upper Police Inspector Ramesh Chopde appealing for peace in the Peace Committee meeting. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पहूरला दोन गटांत हाणामारी; 48 जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील लेलेनगर परिसरात बुधवारी (ता. ११) रात्री ८ ते ९ च्या सुमारास दोन गटांत हाणामारी झाली. यात काही जण जखमी झाले आहेत. लहान मुलांच्या भांडणावरून ही हाणामारी झाली.

घटनेनंतर पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सानप व पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून परिस्थिती आटोक्यात आणली. (Clash between two groups at Pahoor jalgaon crime news )

घटनेप्रकरणी ४८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अजून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आज सकाळी पहूर पोलिस ठाणे येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, जिल्हा परिषद माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, रामेश्वर पाटील, संजय पाटील, डॉ. मोईनुद्दीन, अरूण घोलप, बाबुराव घोंगडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

गुन्हा दाखल झालेल्यांपैकी निर्दोष लोकांची नावे काढण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे यांच्याकडे केली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे म्हणाले, की जे नव्हते त्यांच्यावर अन्याय होणार नाही.

त्यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. या वेळी पोलिस उपअधीक्षक धनंजय येरूळे, पोलिस निरीक्षक सचिन सानप, माजी तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बनकर, माळी समाज माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर करवंदे, अशोक जाधव, पत्रकार गणेश पांढरे, सरपंचपती शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, ग्रामपंचायत सदस्य तेजराज बावस्कर, शेख युसूफ शेख गयासोद्दीन, शेख अमीन, शरद पांढरे, ईका पहिलवान, मुन्ना पठाण, रवींद्र मोरे, इस्माईल, शेख सलीम, सचिन कुमावत आदी उपस्थित होते.

दंगा नियंत्रण पथक तैनात

घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले असून, परिस्थितीवर पोलिस निरीक्षक सचिन सानप व वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, सदर घटनेच्या वृत्तांकनासाठी ग्रामीण रुग्णालयात गेलेल्या पत्रकारांना अश्लील शिवीगाळ करत वार्तांकनात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी शहर पत्रकार संघटनेतर्फे करण्यात आली. या संदर्भात पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले असून, या घटनेचा शहर पत्रकार संघटनेतर्फे निषेध करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT