Beating News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : क्षुल्लक कारणावरून दोन गटांत हाणामारी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : धामणगाव (ता. चाळीसगाव) येथे रविवारी (ता. २७) रात्री दोन गटात किरकोळ कारणावरून वाद होऊन त्याचे पर्यावसान शिवीगाळ, हाणामारीत झाले. यामुळे गावात काही तणाव निर्माण झाला होता.

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात परस्परांविरोधात दंगलीसह ॲट्रॉसिटी व अन्य कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका गटातील नऊ तर दुसऱ्या गटातील १४ अशा २३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Clash between two groups in jalgaon crime news)

त्यात एका गटातील १४ जणांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका झाल्याने त्यांना प्रतिबंधक कारवाईसाठी जळगाव येथे नेण्यात आले आहे. तर ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख हे करीत आहेत.

धामणगाव (ता. चाळीसगाव) येथे एका गटाकडून दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे व तिचा पती यांच्यात दुचाकी देण्यावरून वाद सुरू असताना शेजारील महिलेने तुम्ही मलाच शिवीगाळ करीत आहेत का? अशा गैरसमजुतीतून कुरापत काढली. त्यावरून वाद वाढला. तिथे विरोधी गटाचे काही लोक जमले. यावेळी मारहाण व शिवीगाळ करण्याचे प्रकार घडले.

याप्रकरणी महिलेने दिेलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांविरोधात दंगलीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर दुसऱ्या गटाच्या व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्या बहिणीस काही लोक शिवीगाळ करीत असल्याने तो समजावण्यास गेला असता काही मंडळी जमा झाली व त्यांनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

तसेच घरावर दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडून दरवाजा कोयत्याने तोडला. याप्रकरणी फिर्यादी व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून १४ जणांविरोधात दंगलीसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन गटात किरकोळ कारणावरून उदभवलेल्या वादामुळे गावात काहीकाळ तणावाची स्थिती होती. मेहुणबारे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी धाव घेऊन परिस्थिती शांत केली. दोन्ही गटांनी परस्परांविरोधात फिर्यादी दिल्याने गुन्हे दाखल असून, पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT