Deepak Jondhale  esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : चाळीसगाव ‘तहसील’मधील लिपिकास लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe Crime : येथील तहसील कार्यालयातील लिपिक दीपक बाबूराव जोंधळे याला अडीच हजारांची लाच घेताना धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. (clerk in Chalisgaon tehsil was arrested for taking bribe jalgaon bribe crime news)

तहसीलदार तथा दंडाधिकारी यांच्याकडे दाखल प्रकरणात संशयिताला जामिनावर मुक्त करण्यासाठी अडीच हजारांची लाच लिपिक दीपक जोंधळे (४७, रा. शास्त्रीनगर, प्लॉट क्रमांक १६, कापड मिलमागे, चाळीसगाव) याने मागितली होती.

तक्रारदाराचे पक्षकारांविरुद्ध दाखल गुन्ह्यात मेहुणबारे पोलिस ठाण्याकडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील संशयितास पुढील तारीख न देता जामिनावर मुक्त करण्याच्या उद्देशाने मदत करण्यासाठी दीपक जोंधळे यांनी अडीच हजारांच्या लाचेची मागणी केली.

ही रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली आहे. जोंधळे यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, मकरंद पाटील, चालक सुधीर मोरे आदींच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT