Closed house broken esakal
जळगाव

Crime News Jalgaon : मोहाडी रोडवरील राधेश्याम कॉलनीत बंद घर फोडले

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील मोहाडी रोड परिसरातील राधेश्याम कॉलनीत बंद घर फोडून सुमारे दोन लाख २७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याचा प्रकार बुधवारी (ता. १२) उघडकीस असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहाडी रेाडवरील हटकर मंदिराजवळील राधेश्याम कॉलनीत हर्षा गोविंदा भागवानी (वय २७) या पती, सासू व सासरे अशा कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. गुरुवारी (ता. ६) हर्षा भागवानी पतीसह मुंबईला गेल्याने सलग तीन दिवस घर बंद होते.(Closed House Broken theft into mohadi jalgaon Crime News)

घराला कुलूप लावल्याची रेकी करून चोरट्यांनी मुख्य दाराचा कडीकोयंडाच कटरने कापून आत प्रवेश केला. घरातील १४ हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख २७ हजारांचा ऐवज नेला आहे. हर्षा भागवानी मुंबईहून बुधवारी परतल्या असून, घरफोडी झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

SCROLL FOR NEXT